

इस्टर्न फ्री वे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हदरम्यान भुयारी मार्ग तयार
४० मिनिटांचा प्रवास होणार ५ मिनिटांत
मुंबईतला इस्टर्न फ्री वे वरून पॉइंटकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. वाहनधारकांना तांसतास वाहनांच्या रांगेत उभं राहावे लागते. यावर आता MMRDA ने गेमचेंजर पर्याय शोधून काढलाय. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हदरम्यान भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. या मार्गाच्या अंडरग्राउंड भोगद्याचे खोदकाम पूर्ण झालं आहे. यामुळे ४० मिनिटांचा प्रवास फक्त ५ मिनिटांत होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईत भूपृष्ठावरील रस्ते विस्तार करण्यासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अंडरग्राऊंड मार्गाची वाहतूक सुविधा निर्माण करण्याकडे भर दिला जात आहे. ऑरेंज गेट टनेल प्रकल्प हा मुंबई बहुस्तरीय वाहतूक परिसंस्था उभारण्याच्या एमएमआरडीएच्या व्यापक दृष्टीकोनाचा भाग म्हणून विकसित केला जातोय. या अंतर्गत उन्नत मार्गिका, मेट्रो प्रणाली, भूमिगत रस्ता नेटवर्क, किनारी पायाभूत सुविधा वेगाने विस्तारल्या जात आहेत. या सर्व सुविधा एकात्मिक गतिशीलता संरचना म्हणून कार्य करतील.
प्रकल्पाचा मार्ग मुंबईतील सर्वाधिक पायाभूत सुविधा संवेदनशील असलेल्या नागरी भागातून जात आहे. तसेच भुपृष्ठावरील शहराच्या दैनंदिन कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, याचीही काळजी घेतली जात आहे. नवीन प्रकल्प पूर्व-पश्चिम भागाला संपर्क निर्माण करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. तसेच यामुळे प्रमुख वाहतूक मार्गावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे ४० मिनिटांवरून अंदाजे ५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. अंडरग्राऊंड महामार्गामुळे प्रमुख रस्ते नेटवर्कमुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
कसे असेल महामार्ग?
अंदाजे ४.८ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यांसह एकूण सिंगल कॅरजवे टनेल असे मार्ग असेल. प्रत्येक बोगद्यात दोन वाहतूक मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहे. कार्यक्षम वाहतूक प्रवाहासाठी ८० किमी प्रतितास वेगमर्यादा निर्धारित केली आहे. अधिक सुरक्षितता आणि आपात्कालीन प्रवेशाठी ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेज असणार आहे. जमिनीखालून जवळपास ५० मीटर खोलीपर्यंत बोगद्याची रचना असणार आहे.
अंडग्राऊंड महामार्गाचा स्लरी शिल्ड TBM प्रकार आहे. कटर हेड व्यास 12.19 मीटर इतका असणार आहे. लांबी 80 मीटर असणार आहे. तर वजन अंदाजे 2,400 टन इतकं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.