Kapil Sibbal Saam TV
मुंबई/पुणे

Kapil Sibbal in SC: 'केस जिंकणे किंवा हारणे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही...', असं म्हणत कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद संपवला

वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमक पवित्रा घेतल राज्यपालांच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित केला.

Shivaji Kale

Kapil Sibbal in Supreme Court: राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमक पवित्रा घेतल राज्यपालांच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित केला. तसेच मी इथे केस जिंकणे किंवा हारणे यासाठी उभा नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं.

कपिल सिब्बल यांनी आपला युक्तीवाद संपवताना म्हटलं की, मी इथे केस हारणे किंवा जिंकण्यासाठी उभा नाही. माझ्यासाठी ते महत्त्वाचे नाही. मला वाटतं संविधानिक संस्थांची इंटग्रीटी राहिली पाहिजे. संविधानिक प्रक्रिया जिवंत राहिली पाहिजे. (Political News)

कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तीवादात राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. राज्यपालांकडे गेलेल्या ३९ आमदारांनी तेच शिवसेना आहेत हे कसं ठरवलं? राज्यपालांची संविधानिक नैतिकता काय आहे? असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. ते ३९ आमदार शिवसेनेचे आहेत की नाहीत याची खात्री राज्यपालांनी केली असती तर सरकार कोसळले नसते.

जेव्हा सत्ताधारी पक्षाचे साइजेबल आमदारांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस बजावली जाते तेव्हा राज्यपालांची भूमिका काय असणार? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर बोलताना कपिल सिब्बल यांनी म्हटलं की, राज्यपालांनी अगोदर किती आमदार अपात्र होत आहेत आणि त्यानंतर हे सरकार अल्पमतात आलं आहे का? याचा विचार करायला हवा होता. राज्यपालांनी सरकार पडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकार पाडण्यासाठी मदत करु नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT