Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस खोक्यांखाली चिरडलेत; संजय राऊतांची खोचक टीका

"एकनाथ शिंदे हे आमचे विश्वासू सहकारी होते त्यांच्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती"
Devendra Fadnavis Vs Sanjay Raut,
Devendra Fadnavis Vs Sanjay Raut, Saam TV

Sanjay Raut Latest News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे कारण ४० खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत. त्यामुळे सामना कार्यालयात झालेल्या पोलिसांच्या दमदाटीबद्दल मी त्यांना भेटणार नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

मी नाशिक दौऱ्यावर असताना माझं पोलिसासोबत बोलणं झालं होतं. मी त्यांना सांगितलं होतं की मी नाशिक दौऱ्यावर आहे त्यामुळे आत्ता येऊ नका. तरीही मी नसताना पोलिसांनी दमदाटी करत तपासाच्या नावाखाली सामना कार्यालयात घुसून दहशत निर्माण केली.

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut,
Chandrapur News : जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश; प्रशासनात मोठी खळबळ, काय आहे प्रकरण?

आधीच प्रिंट करून आणलेल्या मजकूरावर साक्षीदारांच्या सह्या घेतल्या. मी पोलीस आयुक्तांना परत पत्र लिहीत पोलिसांनी कार्यालयात येऊन काय केलं हे कळवणार आहे असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

जावेद अख्तर यांचा अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हव

जावेद अख्तर यांचा अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हव. ज्या पद्धतीने जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर त्यांची धुलाई केली त्यासाठी हिंमत लागते. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी जावेद यांच्या हिंमतीला दाद द्यावी. भाजपने जावेद अख्तर यांच्यावर नेहमी टीका केली. त्यांना पाकिस्तानमध्ये जा, असा इशारा दिला. मात्र पाकिस्तानमध्ये जाऊन टीका करणे याला या ५६ इंचाची छाती लागते अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut,
Thackeray vs Shinde : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा तिसरा दिवस; आज कोणते युक्तिवाद होणार?

शिंदे बंड करणार अशी कुणकुण लागल्यानंतर...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंड करणार अशी कुणकुण लागल्यानंतरही आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी मी कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही, पक्षाशी बेईमानी करणार नाही. पक्षनिष्ठा बाळगेन असं सांगितलं होतं मात्र शिंदे भलतंच वागले.

एकनाथ शिंदे हे आमचे विश्वासू सहकारी होते त्यांच्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. तरीही त्यांनी असं वागून दाखवलं. मतभेद असतात, वाद असतात तरीही शिंदे यांनी असं केलं. माझ्यावर सध्या गुन्हे दाखल केले जात आहेत काही हरकत नाही मी घाबरत नाही असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com