Uddhav Thackeray: काँग्रेस-राष्ट्रवादीही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? ठाकरे गटाची बार्गेंनिंग पॉवर कमी होणार?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, परंतु हा निर्णय त्याच्यासाठी नंतर किती कठीण जाईल याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSaam TV
Published On

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एकामागून एक राजकीय संकटं येत आहे. आधी ४० आमदार सोडून गेले,त्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि सत्ता गेली, आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणही गेलं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून दूर जात कॉंग्रेस आणि एनसीपीच्या पाठिंब्याने सरकारची स्थापना केलं, तेव्हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी हा एक धक्कादायक निर्णय होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, परंतु हा निर्णय त्याच्यासाठी नंतर किती कठीण जाईल याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती.  (Latest Marathi News)

Mahavikas Aghadi
Sanjay Raut Expulsion : सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार?

उद्धव ठाकरे यांचा हाच निर्णय मान्य नाही असं म्हणत अडीच वर्षांनी शिवसेनेतील ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावाही केली. या बंडखोरीने उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणही गेलं. उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु बुधवारी सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

उद्धव ठाकरेंसाठी अडचणी इथेच थांबत नाहीत. उद्धव ठाकरे यांची कमी झालेली राजकीय ताकद त्यांच्या आणखी अडचणी निर्माण करु शकते. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सारखे मित्रपक्ष या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने हळूहळू उद्धव ठाकरे यांना टाळू देखील शकतात. मुख्यमंत्रीपदासाठी तर राष्ट्रवादीकडून नावं देखील समोर येत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळी शिवसेनेची ताकद सर्वाधिक होती. मात्र सध्याची स्थिती अगदी उलट आहे. आगामी निवडणुकांमध्ये वाटाघाटींदरम्यान ठाकरे गटाची बार्गेंनिग पॉवरही कमी होऊ शकते.

याशिवाय बीएमसी निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी पहिलं सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबई महापालिकेवर मागील 25 वर्षांपासून राज्य केले आहे, परंतु ती शिवसेना ठाकरे कुटुंबातील होती. आता शिवसेना एकनाथ शिंदेची बनली आहे. पुढील काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक होईल. तिथे उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे.

या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणं तयार होऊ शकतात. बीएमसीमध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय युती ही राज्यासाठी एक नवीन राजकीय प्रयोग आहे. मात्र ठाकरे गट आणि वंचितची युती काँग्रेस राष्ट्रवादीला मान्य आहे की नाही अद्याप स्पष्ट नाही. कारण प्रकाश आंबेडकर सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची वंचित सोबतची युती त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीपासून दूर नेऊ शकते.

Mahavikas Aghadi
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस खोक्यांखाली चिरडलेत; संजय राऊतांची खोचक टीका

प्रकाश आंबेडकर यांच्याशी उद्धव ठाकरेंची युती अद्याप मुंबई महापालिकेसाठी आहे. मात्र लोकसभेसाठी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आहे. बुधवारी सामनात लिहिलेल्या लेखातूनही हे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांना दिलासा म्हणजे सत्ता व पक्ष गमावल्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. पक्षात बिघाड झाल्यानंतर झालेल्या दोन सर्वेक्षणांमध्ये, त्यांच्या यूपीएच्या जागा सतत वाढल्या आहेत. ऑगस्ट २०२२ च्या सी वोटर सर्वेक्षणात यूपीएला ३० जागा मिळाल्याचे दाखवले होते, तर जानेवारी २०२३ च्या सर्वेक्षणात 34 जागांवर आहे. त्याच वेळी सत्ता आणि पार्टी मिळवल्यानंतरही शिंदे गट अद्याप यश मिळवू शकला नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-शिंद गटाला ५ पैकी ४ जागा गमावल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com