Kanjurmarg Badlapur Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Kanjurmarg Badlapur Metro: कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोचं काम या वर्षीच होणार सुरु; विक्रोळी, अंबरनाथ... कोणती स्थानके असणार?

Kanjurmarg Badlapur Metro Line 14 Work will Start in 2026: कांजुरमार्ग ते बदलापूर अशी मेट्रो लाइन लवकरच सुरु होणार आहे. या मेट्रोचं काम २०२६ मध्ये सुरु करणार आहे.

Siddhi Hande

कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रो लाइन होणार सुरु

२०२६ मध्ये काम सुरु होणार

कशी असणार मार्गिका

मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. मुंबई आणि बदलापूरला जोडणारा नवीन मेट्रो मार्ग लवकरच सुरु होणार आहे.कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रो १४ मार्गाचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत याबाबत माहिती दिली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी या प्रकल्पासाठी अर्थसाह्य करण्यासंदर्भात ओपेक फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या शिष्टमंडळाने एमएमआरडीएचे महानगर आयुक्तांची भेट घेतली. कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोचा खर्च १८ हजार कोटी आहे. मेट्रो ५ म्हणजे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी सिस्टम कंपोनंट्सचे वित्तपुरवठा करणार आहे. यानंतर आता मेट्रो मार्ग १४ सह मुंबईतील पाणीपुरवठासाठी आर्थिक सहभाग देण्याची संस्थेची तयारी आहे.

कधी सुरु होणार काम

या मेट्रो कामाचा खर्च १८ हजार कोटी आहे. यामध्ये स्थानके, पुल-बोगदे, सिग्नल आणि तांत्रिक गोष्टींचा समावेश आहे. या अहवालास मंजुरी दिली आहे. या मेट्रोच्या कामाची सुरुवात २०२६ मध्ये सुरु केली जाणार आहे. हे काम २०३० पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. यासाठी मंजुरी मिळाली आहे. लवकरच सर्व गोष्टींचा पाठपुरावा करुन कामाला सुरुवात होणार आहे.

कसा असणार मार्ग (Kanjurmarg Badlapur Metro Route)

कांजुरमार्ग बदलापूर मार्ग ३८ ते ४५ किलोमीटर लांब असणार आहे. यामध्ये १५ ते २० स्थानके असणार आहे. हा मार्ग कांजुरमार्ग येथून सुरु होणार आहे. कांजुरमार्ग, विक्रोळी, शीळफाटा, म्हापे, तुर्भे आणि शेवटी बदलापूर अशी स्थानके असणार आहे. यामधील काही स्थानके भूमिगत असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT