Mumbai Crime: मैत्री, प्रेम आणि लग्न ; लग्नाच्या 4 महिन्यांनंतर पत्नीची हत्या, कांजुरमार्ग हत्येचं युपी कनेक्शन

Husband Killed Wife: मुंबईत पती-पत्नीमध्ये भांडण होऊन पत्नीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Husband Killed Wife In Mumbai

मुंबईत (Mumbai) पती-पत्नीमध्ये भांडण होऊन पत्नीचा खून झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या २२ वर्षीय पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. मुंबईतील कांजूरमार्ग येथे चार महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं. आरोपी राजेश यादव (२४ वर्ष) टेम्पो चालक म्हणून काम करतो. त्याला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथून अटक केली आहे.  (Latest Crime News)

पती-पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली आली. हत्येमागील नेमके कारण अद्याप पोलिसांना सापडलेलं (Husband Killed Wife) नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी आरोपी आणि त्याची मृत पत्नी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आले होते. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर लग्न झालंं होतं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नीचा खून केला

याप्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, 24 वर्षीय राजेश यादव याने त्याची पत्नी दीपा हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मृत बायकोचे हातपाय बांधले. तिचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला आणि तो घराला कुलूप लावून पळून (Husband Killed Wife In Mumbai) गेला.

मुंबईत ते भाड्याच्या घरात राहत होते. मागील रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मंगळवारी शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करून पोलिसांना कळवले, तेव्हा हे खून प्रकरण उघडकीस आलं.

Crime News
Sambhajinagar Crime: विद्यापीठातूनच तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; आरडाओरड केल्याने आरोपी फरार, संभाजीनगरमध्ये खळबळ

तांत्रिक माहितीच्या साहाय्याने आरोपीला पकडले

शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. घर मालकाच्या उपस्थितीत खोलीचा दरवाजा तोडण्यात (mumbai news) आला. खोलीत दिपाचा मृतदेह असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी सांगितले की, चौकशीत पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती त्यांना शेजाऱ्यांकडून मिळाली (crime news) होती. हत्येनंतर आरोपी पती बेपत्ता झाला होता. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट-7 कडूनही या घटनेचा तपास सुरू करण्यात आला (mumbai crime) होता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे त्याच्या मूळ गावी जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे पोहोचून आरोपीला पकडले.

Crime News
Beed Crime News : करणी केल्याचा खोटा दावा करून बदनामी केल्याप्रकरणी 5 जणांवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com