Beed Crime News : करणी केल्याचा खोटा दावा करून बदनामी केल्याप्रकरणी 5 जणांवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल

बदनामी केल्याप्रकरणी विवाहितेच्या माहेरकडील एकाने अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली हाेती. या तक्रारीनूसार पाेलिसांनी घटनेचा तपास करीत संशयितांना अटक केली.
beed crime news
beed crime newssaam tv
Published On

Beed News :

डोळ्यात लिंबू पिळून खोटे अंगात आल्याचे नाटक करत करणी, भानामती केल्याचा दावा करुन बदनामी केल्या प्रकरणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात पाच जणांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी पाचही संशयितांना अटक केली आहे. (Maharashtra News)

पााेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार कानडी बदन येथील महिला वैष्णवी साखरे हिच्या सासरचे लोक धनंजय राजाराम जाधव, मंदाकिनी धनंजय जाधव, ज्ञानेश्वर बळीराम जाधव, बालासाहेब साखरे हे तिच्या अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव येथे माहेरी गेले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेव्हा गावातील बाबुराव एकनाथ बोडके, शशिकला एकनाथ बोडके यांना गावातील हनुमान मंदिरात बोलावून घेण्यात आले. विवाहितेचे सासरे बालासाहेब साखरे यांनी वैष्णवी साखरे हिच्या डोळ्यात लिंबू पिळत तुझ्यावर कुणी करणी केली आहे त्यांची नावे आम्हाला सांग असा विवाहितेवर दबाव आणला.

beed crime news
Ambadas Danve Video : जनता दरबारातून अंबादास दानवेंचा पोलिस अधीक्षकांना फाेन, सुनावले खडेबोल (पाहा व्हिडिओ)

तेव्हा विवाहिता वैष्णवी साखरे हिने अंगात आल्यासारखे करून बाबुराव एकनाथ बोडके, शशिकला बाबुराव बोडके, दिलीप रामभाऊ माळी, मीरा दिलीप माळी यांची नावे घेतली.. दरम्यान बदनामी केल्याप्रकरणी माहेर कडील बाबुराव एकनाथ बोडके यांनी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनूसार पाेलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

beed crime news
Shambhuraj Desai : 'ते' मद्य विक्री केंद्र दहा दिवस बंद ठेवा, मालकांना सांगा... : शंभूराज देसाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com