nashik  Saam tv
मुंबई/पुणे

Kamayani Express : मोठी बातमी! धावत्या कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनला आग

Kamayani Express train Fire : कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली.

Vishal Gangurde

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : नाशिकच्या इगतपुरीजवळ कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. एक्स्प्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. इंजिनला अचानक आग लागल्यानंतर एक्स्प्रेस इगतपुरीजवळ थांबवली. या घटनेने ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी ते मुंबई धावणारी कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. इगपुरीजवळ एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर कामायनी एक्सप्रेस तातडीने थांबवण्यात आली.

कामायनी एक्स्स्प्रेसच्या इंजिनला आग लागल्यानंतर सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. इंजिनची तपासणी सुरु असल्यानं कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी आहे. या घटनेमुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

इंजिनला आग लागल्यामुळे मागील अर्धा ते पाऊण तासांपासून कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी आहे. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

प्रवाशांची धावाधाव

इंजिनला आग लागल्यानंतर एक्स्प्रेस जाग्यावर थांबवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. इंजिनमधून धूर येऊ लागल्याने एक्स्प्रेस थांबल्यानंतर काही प्रवासी ट्रॅकवर उतरले. तर काही जण दरवाज्याजवळ येऊन थांबले. या आगीवर नियंत्रण मिळवल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रूग्णालयातून पळून घरी आला, दुसऱ्या दिवशी रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळला; सांगलीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी साचलं

Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती

भगव्या शालीवरून कोकणात वाद पेटला; नितेश राणे विरुद्ध उदय सामंत|VIDEO

CBSE Class 10 Exam Pattern Change : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, प्रमुख विषयांच्या परीक्षेत महत्वाचे बदल, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT