Kalyan Vamsadhara River Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Waldhuni River: 'नदी चोरीला गेली', मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार

'नदी चोरीला गेली', मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Vamsadhara River: वालधूनी नदी प्रदूषणाचा विळख्यात अडकली असताना अतिक्रमणामुळे वालधुनी नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. प्रदूषण व नदी पात्रातील अतिक्रमणामुळे नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. नदीचे पात्र अरुंद झाल्यामुळे पावसाळयात नदीचे पाणी लगतच्या परिसरात असलेल्या नागरिकांच्या घरात शिरते.

या वालधुनी नदी प्रश्नी मनसेने आक्रमक पवित्र घेतलाय. वालधुनी नदी चोरीला गेल्याची तक्रार मनसेचे उपजिल्हाध्यक्ष उदय वाघमारे यांनी केली आहे. त्यांनी पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारी विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वालधूनी नदी ही मलंग गडाच्या डोंगर रांगातून वाहत कल्याण खाडीला येऊन मिळते. या नदी पात्रा लगत नागरीककरण झाले आहे. त्याचबरोबर लघू आणि बड्या उद्योगांचे सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी पात्रात सोडले जाते.  (Latest Marathi News)

या प्रकरणी राष्ट्रीय हरीत लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात दावे दाखल आहे. हे दावे न्याय प्रविष्ट आहेत. महाराष्ट्रातील ४२ प्रदूषित नद्यांपैकी वालधूनी नदी ही सगळ्यात जास्त प्रदूषित नदी आहे. या नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. नदीचा नाला झाला आहे. या नदी पात्रात बेसुमार बेकायदा बांधकामे झालेली आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे.

दर पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर नदी काठची लोकवस्ती पाण्याखाली जाते. नागरीकांच्या घरात पाणी शिरते. नदीची लो लाईन लक्षात न घेता बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. या सगळ्या विविध कारणामुळे नदी राहिलीच नसून नदी चोरीला गेल्याचे मनसे उपजिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चाैकशी करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT