Vishal Gawli death case Sister makes serious allegations Saam Tv News
मुंबई/पुणे

Vishal Gawli : १०० किलो वजनाचा माणूस, आतमध्ये टॉवेलने कशी आत्महत्या करेन? विशाल गवळीच्या बहिणीचा थेट सवाल

Kalyan Vishal Gawli Suicide : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी तळोजा जेलमध्ये असलेला आरोपी विशाल गवळीने पहाटे साडेतीन वाजता गळफास लावून केली आत्महत्या केली.

Prashant Patil

ठाणे (कल्याण) : काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अवघ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याने आज रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. सध्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तर विशाल गवळी याचा मृतदेह दक्षिण मुंबईतील जे .जे .रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

याचदरम्यान, विशाल गवळीच्या बहिणीने विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, 'माझा भाऊ १०० किलो वजनाचा माणूस होता. तो जेलमध्ये टॉवेलच्या साहाय्याने कशाप्रकारे आत्महत्या करेन, हे असं होऊच शकत नाही. पोलीस प्रशासन हे आतमध्ये काय करत होते? कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलं होतं? राजकीय बल असताना हे कसंकाय घडणार?', असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीने विचारला आहे.

'रात्री माझ्या भावजाईला पीडित मुलीचा बापाने रात्रभर शिव्या दिल्या. तिथे स्थानिक नागरिक जे मनपामध्ये काम करायला जातात, त्यांना देखील तो सांगतोय की, मला एकनाथ शिंदेचा सपोर्ट आहे. मी वरपर्यंत फोन करेन. त्या परिसरात तो माझ्या वहिनीला देखील तो तिथे जाऊ देत नाही. पोलीस देखील आम्हाला मदत करत नाहीयत. आम्ही १० वाजता रात्री पोलीस स्टेशनला गेलो. ते सांगताय की, आम्ही त्यांना सपोर्ट करु पण तुम्हाला नाही', असं गंभीर आरोप देखील विशालच्या बहिणीने पोलीस प्रशासनावर केले आहेत.

दरम्यान, विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं. मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या फोटोला हार घालत आणि त्याच्यासमोर दिवा लावून पूजा केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'आमच्या दीदीसोबत नराधमाने जे कृत्य केलं, त्यासाठी आम्ही कोर्टात लढत होतो. विशाल गवळीने जे काही कृत्य केलं होतं, त्याची शिक्षा त्याला देवाने दिली. त्याच्यासोबत 'जशास तसा' न्याय झाला. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. पोलिसांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला. मी त्यांचाही आभारी आहे. प्रशासनाने चांगलं काम केलं आहे', असं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT