Kalyan Waldhuni flyover closed for 20 days  
मुंबई/पुणे

Kalyan Traffic : कल्याण पूर्व-पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल बंद, २० दिवसांसाठी पर्यायी मार्ग, वाचा सविस्तर

Kalyan east west traffic diversion Latest News : कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा वालधुनी उड्डाणपूल डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी २० दिवस बंद राहणार आहे. या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग लागू करण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी, कल्याण

Kalyan Waldhuni flyover closed for 20 days : कल्याण पश्चिम अन् पूर्वेला जाणारा वालधुनी उड्डाणपूल आजपासून २० दिवस बंद करण्यात येत आहे. डांबरीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज रात्रीपासून पुढील 20 दिवस वालधुनी उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबत अधि सूचना काढली आहे. शाळांना असणारी नाताळची सुट्टी लक्षात घेऊन या पुलाच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या आधी कल्याण मुरबाड मार्गावरील शहाड उड्डाणपूल आणि त्यानंतर एफ केबिन रोड परिसरातील उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता या कल्याणातील तिसऱ्या महत्त्वाच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या वालधुनी उड्‌डाणपुलाचे (सुभाषचंद्र बोस) डांबरीकरणाचे आणि बेअरिंग रिप्लेसमेंट एक्सपांशन जॉईंट (Bearing Replacement Expansion Joint) चे काम करण्यात येणार आहे. हे काम २० डिसेंबर २०२५ ते १० जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे.

प्रवेश बंद - १) कल्याण पुर्वेकडून स्व. आनंद दिघे ब्रिज वरून कल्याण पश्चिम कडे वालधुनी ब्रिज मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग - सदरची वाहने सम्राट चौक (डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे उजवे वळण घेवुन पुढे शांतीनगर उल्हासनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद - २) उल्हासनगर शहरातून सम्राट चौक मार्गे, वालधुनी ब्रिजवरून कल्याण पश्चिमकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्म्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग - सदरची वाहने सम्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे डावीकडे वळण घेवून पुढे स्व. आनंद दिघे ब्रिज वरून इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद - ३) कल्याण पश्चिम वालधुनी ब्रिज वरून सम्राट चौक मार्गे उल्हानगर व स्व. आनंद दिघे ब्रिज वरून कल्याण पुर्वेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सुभाष चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग -सदरची वाहने सुभाष चौक येथुन सरळ पुढे, कर्णिक रोड, प्रेम ऑटो येथे उजवीकडे वळण घेवून शहाड ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT