मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण आणि तळोजा या दोन महत्त्वपूर्ण शहरांना जलदगतीने जोडण्याच्या दृष्टीने मेट्रो मार्ग १२ च्या कामाचा शुभारंभ करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग १२ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शुभारंभ झाल्यावर लगेचच पायलिंगच्या कामाला सुरुवात झाली. ही मेट्रो मार्गिका मुंबई महानगर प्रदेशातील दक्षिण मुंबई, ठाणे आणि नवीमुंबई, विरार, मीरा-भाईंदर शहराना जोडून एक नवी आणि पर्यावरणपूरक अशी वाहतूक प्रणाली उदयास येणार आहे. तसेच ही मेट्रो मार्गिका या भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आणि मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागांत समान रोजगार संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कल्याण - तळोजा दरम्यानच्या या मेट्रो १२ मार्गिकेचा उद्देश हा मुंबई, ठाणे , नवी मुंबई भागातील विकासाला गती देणे हा आहे. कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग १२ हे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबई दरम्यानची जोडणी सुधारण्याचे उद्दिष्टाने प्रस्तावित केली आहे. मेट्रो १२ प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी आणि मुंबई येथील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. ही मार्गिका इतर मेट्रो मार्गांशी एकरूप होऊन एकमेकांशी जोडलेले नेटवर्क तयार करणार आहे. हा मार्ग कासारवडवली-वडाळा मेट्रो ५ आणि नवी मुंबई मेट्रोला जोडला जाऊन सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. (Latest Marathi News)
मेट्रो मार्ग १२ ही केवळ कनेक्टिव्हिटी सुधारून सध्याच्या वाहतूक गरजा पूर्ण करणार नसून प्रामुख्याने या भागांतील विकासासाठी उत्प्रेरक ठरणार आहे. तसेच प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग १२ च्या उपलब्धतेमुळे गुंतवणूक आकर्षित करून आणि मेट्रो स्थानकांभोवती व्यावसायिक आणि रिअल इस्टेट विकासाला चालना देऊन आर्थिक वाढीस चालना देऊ शकते. हा मेट्रो मार्ग वाहतुकीचा एक सुरक्षित आणि कार्यक्षम मार्ग प्रदान करेल, ज्यामुळे रस्त्यावरील प्रवासाशी संबंधित अपघातांचा धोका कमी होईल. हे रहिवासी आणि अभ्यागतांसाठी गतिशीलता वाढवू शकते.
प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमुळे वाहनांच्या संख्येत घट झाल्याने रस्ते बांधणी आणि देखभाल याचा खर्च कमी होईल. मुंबई मेट्रो मार्ग १२ मुळे लोकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करून, रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होईल. अधिक लोक त्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून मेट्रोची निवड करत असल्याने, इंधनाच्या वापरात घट झाल्यामुळे हरित वायू (Greenhouse Gases) उत्सर्जन कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल वायू प्रदूषण कमी होणार आहे, डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर न करता इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड मेट्रो गाड्यांकडे वळल्याने वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते.
ज्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला फायदा होणार आहे, वाहतूक व्यवस्थापन सुधारून प्रवाश्यांना उत्तम आरामदायी व्यवस्था मिळेल, त्यामुळे जीवनाचा दर्जा सुधारेल. सदर मार्गिका ही सिडको व एमआयडीसी क्षेत्रातून जात असल्याने या क्षेत्रांना भविष्यातील प्रगतीला वाव मिळेल. या मार्गिकेचा उद्देश मुंबई शहर आणि त्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील विकास कामांना गती देणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.