Govt Hospital Scandal: चादर अंगावर ओढली; हॉस्पिटलच्या वेटिंग एरियातच जोडप्याने ठेवले शरीरसंबंध; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

Couple Caught Doing Obscene Act Under Blanket: मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्हा रुग्णालयात पांघरूणाखाली जोडपे अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
A couple allegedly caught inside Ashoknagar District Hospital under a blanket, moments before the viral video was recorded.
A couple allegedly caught inside Ashoknagar District Hospital under a blanket, moments before the viral video was recorded.Saam Tv
Published On
Summary

मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्हा रुग्णालयात जोडपे पांघरूण ओढून अश्लील कृत्य करताना आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

रुग्णालयाच्या गेटपासून पार्कपर्यंत दोन वेगवेगळे अश्लील व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली.

२२ सुरक्षा रक्षक असतानाही अशा घटना घडत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

प्रकरण उघड होताच प्रशासनाने सुरक्षा एजन्सीला नोटीस देत तात्काळ चौकशीचे आदेश दिले.

मध्यप्रदेशातील एका जिल्हा सहकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेले एक पुरुष आणि एक महिला हे पांघरूण ओढून संशयास्पद अवस्थेत आढळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण आणखी गाजू लागले. नागरिकांनी रुग्णालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

A couple allegedly caught inside Ashoknagar District Hospital under a blanket, moments before the viral video was recorded.
Factory Blast : 'मृत्यूची फॅक्टरी'! बॉयलरच्या स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

मध्यप्रदेशमधील अशोकनगर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एक जोडप अश्लील कृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. हॉस्पिटलच्या गेटपासून तर पार्किंगपर्यंत दोन वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

A couple allegedly caught inside Ashoknagar District Hospital under a blanket, moments before the viral video was recorded.
Plane Crash: तेजस लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू; उड्डाणापासून क्रॅशपर्यंतच्या घटनेचा थरारक VIDEO

सोमवारी दोन अश्लील व्हिडिओ व्हायरल होत होते. पहिल्या व्हिडिओमध्ये रुग्णालयाजवळील माधव उद्यान पार्कमध्ये झाडाच्या आड एक प्रेमी युगुल अश्लील प्रकार करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रात्रीच्या वेळी एक जोडपे ब्लॅकेटच्या आतमध्ये शारीरिक संबंध ठेवत असल्याचे धडधडीत दिसून येत आहे. हा व्हिडिओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.

A couple allegedly caught inside Ashoknagar District Hospital under a blanket, moments before the viral video was recorded.
'माझ्याकडे सुप्तशक्ती..' भोंदूबाबानं विवाहितेला पळवून नेलं, दरबारात सापडली कंडोमची पाकिटं अन्..

गेल्या महिनाभरात जिल्हा रुग्णालयात ही दुसरी अशी घटना आहे. याआधी एका रुग्णाच्या पलंगावर दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यानंतर थेट रुग्णालयाच्या आत अश्लील कृत्यांचे व्हिडिओ समोर आल्यानं रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालयात 22 सुरक्षा रक्षक असल्याची माहिती आहे. यांचा सतत पहारा असताना देखील असे प्रकार सर्हास सुरू आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याचा आरोप होत आहे. तसेच पोलिसांनी देखील यावर अजून कुठलीही कारवाई न केल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा एजन्सीला नोटीस बजावली असून तात्काळ स्पष्टीकरण मागवले असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com