Girija Oak: 'काही फोटो खूप अश्लील आहेत...'; नॅशनल क्रश गिरिजा ओकच्या फोटोंशी छेडछाड, व्हिडिओ शेअर करत सांगितला सगळा प्रकार

Girija Oak: सोशल मीडियावर एका रात्रीत स्टार मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले या प्रसिद्धीमुळे खूप आनंदी आहे. पण, सोशल मीडियावर तिच्या फोटोंशी छेडछाड केल्यामुळे ती निराशही आहे. हे तिने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले.
Girija Oak
Girija OakSaam tv
Published On
Summary

गिरीजा ओकचा फोटो मॉर्फ करण्यात आला

निळ्या साडीतील साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने

गिरीजा ओकला तिच्या मुलाची चिंता

Girija Oak: सोशल मीडियावर सध्या सर्वांच्याच फिडमध्ये असलेली मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक ही नवी व्हायरल सेन्सेशन आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले हिच्या एका फोटोमुळे ती सोशल मीडियाची नवी व्हायरल गर्लच नाही तर नॅशनल क्रशही बनली आहे.

काही दिवसांपूर्वी गिरीजाने निळ्या रंगाची साडी घातलेला एक फोटो शेअर केला होता. तिच्या साधेपणाने चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला आणि तो फोटो व्हायरल झाला. यानंतर नेटकरी तिचे कौतुक करु लागले पण, काहीजण एआय वापरून या फोटोंचे मॉर्फिंग करत आहेत, त्यामुळे अभिनेत्रीने याची खंत व्यक्त करत एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेल्या प्रकारावर आपले मत मांडले आहे.

Girija Oak
Actor Father Passes Away: बिग बॉस फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; सोशल मीडियावर व्यक्त केली वेदना

गिरीजाचे फोटो मॉर्फ केले होते

"जवान" मधील अभिनेत्री आणि नवीन नॅशनल क्रश गिरीजा ओक गोडबोले हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तिने तिच्या फोटोच्या मॉर्फिंगबद्दल दुःख व्यक्त केले आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणाली आहे की, "गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे काही घडत आहे त्यामुळे मी थोडी गोंधळली आहे. जेव्हा अचानक तुमच्याकडे इतके लक्ष येते तेव्हा काय करावे हे कळणे कठीण आहे. मला लोकांकडून खूप प्रेम देखील मिळाले आहे. मी तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आभार मानू इच्छिते."

Girija Oak
Sachin Pilgaonkar: 'तुझ्या करिअरची ५० वर्षे...'; सचिन पिळगावकर करणार सुबोध भावेच्या आयुष्यावर बायोपिक, नेमकं काय म्हणाले?

व्हिडिओमध्ये ती पुढे म्हणाली, "माझे कुटुंब आणि चाहते मला वेगवेगळे फोटो आणि मीम्स पाठवत आहे, त्यापैकी काही खूप चांगल्या आहेत आणि काही मजेदार आहेत. पण, यातील काही फोटो आणि पोस्ट खूप अश्लील देखील आहेत. माझे फोटो एआय वापरून मॉर्फ केले जात आहेत आणि पोस्ट केले जात आहेत. मी या काळातील मुलगी आहे, मी सोशल मीडिया वापरते आणि मला माहित आहे की सोशल मीडिया कसे काम करते. सोशल मीडिया हा एक संपूर्ण खेळ आहे जो आपण सर्वजण खेळतात. मला या खेळाबद्दल माहिती आहे, परंतु या खेळाचे कोणतेही नियम नाहीत, काहीही निश्चित नाही आणि त्याची मला भिती वाटते"

गिरीजा ओकला तिच्या १२ वर्षांच्या मुलाची चिंता

गिरिजाने तिच्या मुलाबद्दल चिंता व्यक्त केली, "माझा १२ वर्षांचा मुलगा आहे. तो आज सोशल मीडिया वापरत नाही, पण काही वर्षांत तो सोशल मीडियाचा वापर करेल. एआय वापरून पुरुष आणि महिलांचे हे फोटो एडिट, मॉर्फिंग आणि अश्लील बनवले जात आहेत. हे फोटो कायमचे सोशल मीडियावर राहतील. कदाचित उद्या, जेव्हा माझा मुलगा मोठा होईल, तेव्हा तो ते पाहू शकेल का?"

तो काय रिएक्ट करेल याची मला भीती वाटते. त्याला कदाचित माहित असेल की हा एक एआय फोटो आहे, जसे आजकालच्या लोकांना वाटते, पण त्याला फसवले जात आहे हे पाहून मला खूप भीती वाटते. मी जास्त काही करू शकत नाही, पण अशा फोटोबद्दल काहीही करणे मला योग्य वाटत नाही. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे ते बनवणं थांबवा आणि जर तुम्ही त्या लोकांपैकी एक नसाल, तर अशा पोस्टना जास्त प्रोत्साहन देऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com