Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्न विधींना विशेष महत्व आहे. लग्नात अनेक प्रथा पद्धती पाळल्या जातात. लग्नाआधी मुलगा व मुलगी यामध्ये अनेक विधी केले जातात.
शास्त्रानुसार, लग्नाआधी मुलगा व मुलगी यांचा साखरपुडा सोहळा हा कार्यक्रम केला जातो. तुम्हाला साखरपुडा करण्यामागचं नेमकं कारण माहितीये का?
फार पूर्वीपासून लग्नापूर्वी साखरपुडा करतात. साखरपुडा हा दोन्ही कुटुंबांसाठी आणि मित्र-मंडळींसाठी विवाह निश्चित झाला असे दर्शवते.
साखरपुड्यात अंगठीची देवाणघेवाण केली जाते. अंगठीचे वर्तुळ हे नात्यातील अखंडता, प्रेम आणि विश्वास कधीही न तुटण्याचे प्रतीक मानले जाते.
मुलगा व मुलीने घातलेली अंगठी त्या दोघांच्या प्रेमाचे आणि एकजुटीचे प्रतीक म्हणून आयुष्यभर जपली जाते
साखरपुडा सोहळ्यात मुलगा व मुलगी ही दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात, त्यांच्या चालीरीती, अपेक्षा आणि स्वभाव समजून घेतात.
'साखरपुडा' या नावातच गोडवा आहे. या समारंभात मिठाई, साखर किंवा पेढे देऊन नात्यात गोडवा यावा यासाठी देवाणघेवाण केली जाते. या समारंभाने शुभ कार्याची सुरुवात होते