Illegal arms including pistols and bullets seized from Kalyan reel star Surendra Patil during police raid. Saam Tv
मुंबई/पुणे

आधी बलात्कार आता अवैध शस्त्रसाठा; प्रसिद्ध रील स्टार निघाला गँगस्टर

Kalyan Reel Star Surendra Patil Illegal Arms Arrest: कल्याणमधील रील स्टार सुरेंद्र पाटील याला पुन्हा अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ७ पिस्तुल, ३७० काडतुसे आणि इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळखला जाणारा सुरेंद्र पाटील पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. बलात्काराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाटील याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना तब्बल ७ पिस्तुल, ३७० जिवंत काडतुसे, तसेच तलवार आणि चॉपरसारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.

विशेष म्हणजे, हा शस्त्रसाठा लपवण्यासाठी त्याने चपलांच्या स्टँडमध्ये गुप्त कप्पा तयार केला होता. या कप्प्याची रचना अत्यंत शिताफीने करण्यात आली होती, ज्यामुळे संशय येऊ नये याची खबरदारी घेतली गेली होती. पोलिसांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने हा प्रकार केवळ वैयक्तिक वापरासाठी नसून यामागे मोठे रॅकेट किंवा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा साठा नेमका कुठून आणला, कोणाकडून पुरवठा झाला, तसेच यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

सुरेंद्र पाटील याआधीही वादग्रस्त रील्समुळे चर्चेत आला होता. त्याच्या सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हिटीमुळे अनेकदा वाद निर्माण झाले होते. आता या कारवाईनंतर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

Kharat case : ४५ राजकीय नेते खरातच्या दररोज संपर्कात, शिंदे-शेलारांचं लग्नाच्या पत्रिकेत नावं, कोडवर्डनं नंबर सेव्ह

Beed Crime : मला खूप मारले, बदनाम केलं..; प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

भोंदू खरातनंतर आता तलवार बाबाला बेड्या, पोलिस स्टेशनमध्ये जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT