Kalyan Railway Police,  saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : रेल्वे प्रवाशांचे दागिने, मोबाईल चाेरणारा अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई

अन्य गुन्ह्यातील तीन मोबाईलही तपास पथकाने हस्तगत केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अभिजीत देशमुख

Kalyan News : प्रवासी झोपेत असल्याची संधी साधत प्रवाशांचे (passengers) दागिने व मोबाईल (mobile) लंपास करणारा चोरट्याला गजाआड करण्यात पाेलिसांना यश आले आहे. कल्याण (kalyan) रेल्वे गुन्हे शाखेने सीसीटिव्हीच्या सहाय्याने सराईत चाेरट्यास अटक (arrest) केली.

मेल एक्स्प्रेसने प्रवास करत असताना महिला प्रवाशाला झोप लागताच हातचलाखीने तिचे दागिने व मोबाईल घेवून अज्ञात चोरटा पसार झाला .या प्रकरणी या मार्गावरील स्टेशन परिसरातील सीसीटिव्ही तपासात कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सुभान अहमद असे या सराईत चोरट्याने नाव आहे. त्याच्या विरोधात कल्याण ,पुणे ,भुसावळ ,गुजरात भरूच रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सुभान कडून चोरी केलेले सुमारे साडे सहा लाखांचे दागिने तीन मोबाईल असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. (Maharashtra News)

कल्याणमध्ये राहणारे एक व्यावसायिक 30 जानेवारी रोजी अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक एस-5 मधून प्रवास करीत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. सुरत ते भिवंडी प्रवसादरम्यान गाडीत ते दोघेही झोपले असताना त्याचा फायदा घेत फिर्यादीच्या पत्नीची पर्स अज्ञात इसम चोरी करुन पसार झाला.

पर्समध्ये १३ तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल होते .पत्नी पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्याची तक्रार प्रवाशाने डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात केली. कल्याण रेल्वे गुन्हे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. वसई स्टेशनला एक इसम चोरीस गेलेली पर्स घेऊन ट्रॅकवर उतरुन दुस-या दिशेन जात असताना सीसीटीव्हीत दिसून आला.

पोलिस उपायुक्त सचिन कदम, अरसुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश चौगूले, पोलिस कर्मचारी राजेंद्र दिवटे, जर्नादन पुळेकर, रंजित रासकर, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता वसावे, महिंद्र कर्डिले, अजित माने, अजिम इनामदार आणि सोनाली पाटील यांच्या पथकाने तपास करीत सुभान अहमद भायखळा येथून अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT