Grampanchayat Election Expenses : खर्चाचा हिशोब न दिल्याने ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

या निर्णयामुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या समर्थकांत खळबळ उडाली आहे.
wardha, grampanchayat
wardha, grampanchayatsaam tv
Published On

- चेतन व्यास

Wardha News : वर्धा (wardha) जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत (grampanchayat) निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा (election) खर्च उमेदवारांना तीस दिवसांच्या आत संबंधित तहसिलदारांकडे सादर करणे आवश्यक होते. परंतु मुदतीत खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील निवडणूक लढविलेल्या 32 उमेदवारांना ग्रामपंचायत सरपंच व सदस्य म्हणून राहण्यास व पुढील पाच वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबतचा आदेश आज निर्गमित केला.

wardha, grampanchayat
Grampanchayat : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने 23 ग्रामपंचायत सदस्य अपात्र

वर्धा जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यात काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीचा निकाल घोषित झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक होते. परंतु उमेदवारांनी हिशोब सादर न केल्याने त्यांना नोटीस देऊन हिशोब सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या.

त्यानुसार वर्धा तालुक्यातील बोरगाव (ना) येथील 6, सालोड(हि) येथील 2 अशा 8 सदस्यांनीच आपले लेखी म्हणणे सादर केले होते. नोटीस नंतरही आपले खर्चाचे हिशोब अनेक उमेदवारांनी सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निवडणूक आयोगाचे आदेश व मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील निवडणूक लढविलेल्या 32 उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायत सदस्य, सरपंच राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष उमेदवार निवडणूक लढवू शकणार नाही.

wardha, grampanchayat
Marathi Sahitya Sammelan 2023 : साहित्य संमेलनात तीन काेटी, 'विद्राेही' त पंचावन्न लाखांची पुस्तक विक्री, 'या' पुस्तकांची मागणी वाढली

जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्यांमध्ये वर्धा तालुक्यातील सालोड (ही) ग्राम पंचायतीमधील 16 उमेदवारांचा समावेश आहे. याच तालुक्यातील बोरगाव (ना) या ग्रामपंचायतीमधील 6 उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. (Maharashtra News)

आर्वी तालुक्यातील मांडला ग्रामपंचायतीतील 2, पिपरी (भुतडा) ग्रामपंचायती मधील 1, मिर्झापूर नेरी ग्रामपंचायतीमधील 3, अहिरवाडा ग्रामपंचायत 1, सर्कसपूर ग्रामपंचायत 2 तर जाम (पू) ग्रामपंचयतीमधील 1 उमेदवाराचा समावेश आहे असे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com