Marathi Sahitya Sammelan 2023 : साहित्य संमेलनात तीन काेटी, 'विद्राेही' त पंचावन्न लाखांची पुस्तक विक्री, 'या' पुस्तकांची मागणी वाढली

काेराेनानंतर पहिल्यांदाच खूले संमेलन झाल्याने विक्रेत्यांमध्ये देखील आनंद दिसून आला.
Wardha Sahitya Sammelan 2023, Books
Wardha Sahitya Sammelan 2023, Bookssaam tv

- चेतन व्यास

Wardha : वर्धा येथे नुकतेच 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan 2023) झाले. या संंमेलनातील ग्रंथ दालनात तब्बल तीन कोटी रुपयांच्या घरात विक्री झाली. विद्रोही साहित्य संमेलनात असलेल्या पुस्तक दालनात पंचावन्न लाख रुपयांपेक्षा अधिक पुस्तक विक्री झाली आहे. यामुळे या दोन्ही संमेलनाच्या ग्रंथादालनाला साहित्यप्रेमीचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

Wardha Sahitya Sammelan 2023, Books
Ravikant Tupkar : पुन्हा एकदा आर-पारची लढाई; रविकांत तुपकर का झालेत आक्रमक ?

वर्ध्यात झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ दालन हे वैशिष्ट्यपूर्ण होते. या ग्रंथादालनाचे मुख्यद्वार हे पुस्तकाच्या मुखपृष्ठ सारखे बनविण्यात आले होते. या दालनात पुस्तकांसाठी 276 स्टॉल येथे बुक आले होते. तर 19 नॉन बुक स्टॉल वर इतर वस्तू होत्या.

चार दिवसांच्या प्रदर्शनात दोन कोटी 89 लक्ष रुपयांच्या पुस्तकाची विक्री येथे झाली आहे अशी माहिती विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि महेश मोकलकर यांनी दिली. ग्रंथादालनाची जबाबदारी ही नरेश सब्जीवले यांना देण्यात आली होती. त्यांनी संमेलन संपल्यावर पुस्तक विक्रीची माहिती आयोजकांना दिली.

Wardha Sahitya Sammelan 2023, Books
Narayan Rane News: नारायण राणेंच्या राजकीय निराेपासाठी आंगणेवाडीत भाजपचा आनंद मेळावा : वैभव नाईक

तीन काेटींच्या पुस्तकांची विक्री

ग्रंथदालनात विविध प्रकाशन संस्था आणि विक्रेत्यांचे स्टॉल येथे उभारण्यात आले होते. विविध संस्थांनी आपली प्रकाशन गंगाजळी येथे ठेवली होती. ज्ञान सागराच्या दिशेने वळणारी पावले प्रत्येक स्टॉल वर स्थिरावत होती. साहित्य संमेलनात तीन कोटींच्या घरात पुस्तक विक्री झाल्याने विक्रेत्यांमध्ये देखील आनंद दिसून आला.

एक दिवस जादा

साहित्य संमेलनाच्या आधीच ग्रंथ दालनाचे उदघाटन झाले. त्याचा फायदा पुस्तक विक्रेत्यांना झाला. पुस्तक विक्रेत्यांना एक दिवस जास्त मिळाला. पुस्तकप्रेमींना देखील येथे पोहचता आले. साहित्य रसिकांच्या झोळीत पुस्तकरूपी ज्ञान भंडाराची भर पडली.

Wardha Sahitya Sammelan 2023, Books
Gopichand Padalkar : बारामती तालुक्यातील 44 गावं पाण्यापासून वंचित का आहेत ? पडळकरांचा पवारांना सवाल

विद्रोही मराठी साहित्य संमेलनात 55 लाख रुपयांच्या पुस्तकांची विक्री

वर्धेत (wardha) 17 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुद्धा आयोजित करण्यात आले होते. विद्रोही मराठी साहित्य संमेलनात 32 स्टॉल लावण्यात आले होते. येथे 10 हजारांच्या वर संविधानाच्या प्रति विकल्या गेल्या. महात्मा फुले, अ.ह.साळुंखे, यशवंत मनोहर, शरद पाटील यांच्या पुस्तकांना मागणी होती. (Maharashtra News)

'गांधी का मरत नाही' 'हू किल लोहिया' ही पुस्तके सर्वाधिक विकली गेली आहे असे कार्याध्यक्ष किशोर ढबाले यांनी सांगितले आहे. शनिवारी पाच वाजेपर्यंत अनेक प्रकाशकांची पुस्तके संपली त्यामुळे लगबगीने पुस्तके ट्रॅव्हल्सने मागण्याची वेळही प्रकाशकांवर आली असल्याचे त्यांनी सांगितले. 55 लाख रुपयांच्या वर पुस्तके विकल्या गेली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com