Kalyan News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : 'तुला चरबी आली...' कल्याणमध्ये तुफान राडा, रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

Kalyan News : कल्याणमध्ये रेल्वे कंत्राटदार विशाल नायडू यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामागे कुख्यात गुंड प्रशांत देशमुख उर्फ पीडी याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

  • या हल्ल्यामागे कुख्यात गुंड प्रशांत देशमुख उर्फ पीडीचा हात

  • हल्ल्यात विशाल नायडू गंभीर जखमी

  • पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आलेली नाही

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये एका रेल्वे कंत्राटदारावर जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामागे कल्याणमधील कुख्यात गुंड प्रशांत देशमुख उर्फ पीडी याचा हात असल्याचं समोर आलं आहे. बाजारपेठ पोलिसांनी कंत्राटदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान पीडी याने गेल्या काही वर्षापासून अनेकांवर हल्ला केल्याची नोंद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणारे विशाल नायडू हे रेल्वेचे कंत्राटदार आहेत. विशाल यांना होळीच्या दिवशी त्यांना एका मित्राचा फोन आला. त्या मित्राने नायडू यांना सांगितले की, प्रशांत देशमुख याच्याशी बेालून घे. प्रशांत देशमुख आणि विशाल नायडू यांची पूर्वीपासून ओळख आहे. परंतू विशाल नायडू यांच्या मित्रावर चार वर्षापूर्वी हल्ला झाला होता. त्या हल्लाा प्रकरणात प्रशांत देशमुख याचे नाव आले. त्यामुळे विशाल यांनी प्रशांत याच्याशी बोलणे बंद केले. होळीच्या दिवशी विशाल नायडू आणि त्याचा मित्र अनिकेत माने हे विशालच्या घरी असताना अनिकेत माने याच्या मोबाईलवर प्रशांत देशमुख याचा फोन आला.

या फोन कॉल दरम्यान प्रशांतने विशाल यांना शिवी दिली. "तुला चरबी आली आहे. तुला खूप मोठे व्हायचे आहे. आमच्या पुढे जातो का ? असे सांगून आज तुला मारायला प्रतिकला पाठवतो, असे म्हटले. त्यानंतर विशाल नायडू जेवण आणण्यासाठी घराखाली उतरून आधारवाडी सर्कल समोर आले असता त्याठिकाणी प्रतिक ठाकरे , शुभम नाडे, सुजय कदम आणि अक्षय तेली यांच्यासह अन्य दोन ते तीन जण थांबलेले होते.

शुभम नाडे याच्या हातात चाकू होता. तिथे जमलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवत आमच्या मध्ये पडू नका, नाही तर इथेच खलास करु अशी धमकी दिली. त्यानंतर विशाल यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विशाल यांना गंभीर दुखापत झाली. नायडू यांच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT