Non Marathi Family Beaten Marathi Family Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: कल्याणमधील सोसायटीमध्ये राडा; परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबावर हल्ला

Non Marathi Family Beaten Marathi Family: कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीच्या राड्यात मनसेची एन्ट्री झालीय. मराठी माणसाला दमबाजी करणाऱ्याला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी मनसेने केलीय.

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याणच्या अजमेरा हाईट्समध्ये राहणारे अखिलेश शुक्ला यांचा धूप लावण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला. या वादातून त्याने दहा ते पंधरा जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करतो. गाडीला अंबर दिवा लावून फिरतो.

सोसायटीत इतकी दहशत की, कोणीही त्याच्याविरोधात बोलत नाही. दोन दिवसात अखिलेश शुक्लाला अटक झाली नाही, तर रस्त्यावर उतरू. शुक्ला जिथे कुठे असेल त्याला मनसे स्टाईलने पोलिसात हजर करू, असा इशारा पोलिसांना दिला आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणा परस्परविरोधी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारत अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होता होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून शुक्ला याने बाहेरून दहा ते पंधरा जणाना बोलावून घेतले. सोसायटीतील लोकांना माराहाण केली.

विजय कल्वीकट्टे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहे. या प्रकरणी खकडपाडा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान या सोसायटीमधील नागरिकांनी आरोपी केला आहे की ,अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करता. त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो. त्याच्या विरोधात कोणी बोलले तर तो त्याला दमबाजी करतो. काही दिवसांपूर्वी एका किरकोळ कारणावरुन त्याने एका तरुणीला तिच्या वडिलांसमोरच तिच्यावर रेप करण्याची धमकी दिली होती.

या राड्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनात वाघमोडे यांनी सांगितले की, धूप लावण्याच्या वादातून हाणामारी झाली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. अखिलेश शुक्ला याच्याविरोधात गंभीर स्वरपाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणात मनसेनेही एंट्री केली आहे. अखिलेश शुक्ला हा सातत्याने मराठी माणसांना दमबाजी करतो. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला माझी ताकद माहिती नाही. अशाप्रकारे लोकांना भीती दाखवतो. याबाबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली आहे. अखिले शुक्ला यांची मुजोरी मोडीत काढली पाहिजे. त्याची गुंडगिरी सातत्याने सुरु आहे. दोन दिवसात त्याला अटक केली नाही तर मनसे स्टाईलने शुक्ला याला धडा शिकवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT