हिंदू सणांवर निर्बंध हाच ठाकरे सरकारचा अट्टहास: रवींद्र चव्हाण प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

हिंदू सणांवर निर्बंध हाच ठाकरे सरकारचा अट्टहास: रवींद्र चव्हाण

राज्यातील मंदिरं भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी डोंबिवली भाजपच्या वतीने घंटानाद आणि शंखनाद आंदोलन करण्यात आले.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली : राज्यातील मंदिरं Temples भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी डोंबिवली Dombivali भाजपच्या BJP वतीने घंटानाद आणि शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी दहीहंडी उसत्व आणि हिंदू सणावरून भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सरकारवर टीका केली आहे.

हे देखील पहा-

राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपच्या वतीने पुन्हा एकदा राज्यव्यापी घंटानाद आणि शंखनाद आंदोलन करण्यात आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीत सुद्धा भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिर खुली करा अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली. तर भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर बंद, गरिबांचे हाल ठाकरे सरकार मालामाल' आणि 'मंदिर बंद, उघडले बार. ठाकरे सरकार मालामाल अश्या  घोषणा ठाकरे सरकार विरोधात दिल्या.

आंदोलन वेळी आमदार सोबत, माजी नगरसेवक राहुल दामले, संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी दहीहंडी उसत्व आणि हिंदू सणावरून सरकारवर टीका केली आहे. आमदार चव्हाण यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले की हिंदू सणांवर निर्बंध कसे लादता येतील हे महाविकास आघाडी सरकार पहात आहे. पाच वर्षे सरकार टिकले तर हिंदू सण साजरे कसे करायचे नाहीत याची एसओपी ते तयार करतील.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरी केली गोपीनाथ मुंडेंची जयंती

6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6....वैभव सूर्यवंशीनं पाडला षटकारांचा पाऊस; UAE विरुद्ध ठोकलं तुफानी शतक

Late Night Sleep: रात्री १ वाजता झोपणाऱ्यांना डिप्रेशनचा धोका; लेट नाईट स्लीप पॅटर्न मानसिक आरोग्यासाठी घातक

महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Pilot Working Time: पायलट आठवड्यातून किती तास काम करतात?

SCROLL FOR NEXT