गजानन भोईर
वाशिमच्या (Washim) शिवसेनेच्या (Shivsena) खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्या पाच संस्थावर अंमलबजावणी संचलनालयाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 2019 मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्थेच्या कार्यालयातून 7 कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणी किरीट सोमय्या यांनी ट्विट करून खासदार भावना गवळी यांच्यावर केले होते.
पहा व्हिडीओ -
जनशिक्षण संस्था वाशिम व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान रिसोड यांच्या कार्यालयातील जुलै 2019 मध्ये संस्थेचे महत्वाच्या कागदपत्रांसह संस्थेतील सात कोटी रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती माजी शिवसेना नगरसेवक हरीश सारडा यांनी किरीट सोमय्या यांना दिल्यानंतर त्यांनी चोरी गेलेली रक्कम ही हायवे ठेकेदार यांच्याकडून घेतलेली आहे का? असा आरोप करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान चोरीच्या घटनेनंतर खासदार भावना गवळी यांनी 2/2/2020 ला रिसोड पोलीस स्टेशन ला संस्थेचे माजी सचिव अशोक गांडूळे,वर्षाताई हेलसकर, दिनेश दोरशेटवर, भारत देवगिरे,महेश देवगिरे,व अन्य असे एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना केवळ 25 लाखात विकत घेतला आहे.त्यामुळं या कारखाण्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून पुढील दोन आठवड्यात कारवाई सुरू होणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. आज ईडीची रेड झाली असून चौकशी सुरू झाली आहे..
Edited By- Anuradha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.