raju patil  saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Shilphata Road: कल्याण शीळ रोडला पर्यायी रस्ते तयार करा नाहीतर मेट्रोचे काम बंद पाडू, राजू पाटील यांचा सरकारला इशारा

MNS MLA Raju Patil: कल्याण-तळोजा मेट्रोच्या कामामुळे कल्याणच्या शीळफाटा रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कल्याण शीळ रोडला पर्यायी रस्ते तयार करा त्यानंतरच हे मेट्रोचे काम सुरू करा, असे मत राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण शीळ रोडवर मेट्रोचे (Kalyan Metro) काम सुरू झाले आहे. मात्र या कामामुळे निम्मा रस्ता व्यापला गेल्याने कल्याण शीळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय . याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आक्रमक पवित्र घेतलाय. मेट्रोच्या कामामुळे कल्याणच्या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आता मेट्रोच्या कामाला विरोध नाही मात्र कल्याण शीळ रोडला पर्यायी रस्ते तयार करा त्यानंतरच हे मेट्रोचे काम सुरू करा. अन्यथा मेट्रोचे काम बंद पाडू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी सरकारला दिलाय.

मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, 'कल्याण-तळोजा मेट्रो आली. त्याचे काम सुरु केले आहे. हे काम सुरु करण्यापूर्वी कल्याण शीळ रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करा अशी आमची मागणी आहे. कल्याण शीळ रस्त्याला पर्यायी रस्ते नसल्याने वाहनचालकांसह विद्यार्थी रुग्णवाहिकांना देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. डोंबिवली एमआयडीसी परिसरात कंपन्यांना आग लागल्याच्या घटना घडतात. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पोहोचू शकत नाही. यठिकाणी मेट्रोचा कल्याण शीळचा भाग कमी आहे.' तसंच, 'हे काम तळोजापासून सुरु करायला हवे होते. त्या दरम्यान कल्याण शीळ मार्गावरील पर्याची रस्ते तयार करायला हवेत. हे काम केले नाही तर रास्ता रोको करुन मेट्रोचे काम बंद पाडू.' असा इशारा त्यांनी दिला आहे.

डोंबिवलीतील इंडो अमाईन कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर आमदा राजू पाटील यांनी सरकारवर सडेतोड टीका केली आहे. 'हे साधे फेरीवाले हटवू शकत नाहीत कंपन्या हटवू शकतील की नाही याबाबत मी साशंक झालोय.', अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली. डोंबिवलीतील कंपन्यात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहे. अमूदान कंपनीच्या स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते. सरकारच्या या घोषणेनंतर राजू पाटील यांनी सरकारवर हे टीकास्त्र सोडले आहे.

आज डोंबिवली पाटीदार सभागृहात कल्याण ग्रामीणमधील पाणी समस्याबाबत मनसे आमदार राजू पाटील, माजी नगरसेवक जालिंदर पाटील रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांसमोर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सरकारची पाठपुरावा सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे लवकरच या समस्या मार्गी लागतील असं आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT