A chaotic scene at an election rally in Kalyan after a flag came in contact with a live electric wire, causing a blast. Saam Tv
मुंबई/पुणे

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठी दुर्घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Election Rally Accident Due To Hanging Electric Wire: कल्याणमध्ये महापालिका निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान विजेच्या लोंबकळणाऱ्या तारेस झेंडा लागून स्फोट झाला. या दुर्घटनेत एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराच्या सांगतेदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. योगिधाम परिसरात पॅनल क्रमांक दोनमधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान अचानक स्फोट होऊन एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे.

महायुतीचे उमेदवार दया गायकवाड, वनिता पाटील, गणेश कोट आणि अनघा देवळेकर यांच्या प्रचारासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीदरम्यान एका कार्यकर्त्याच्या हातातील झेंडा टाटा कंपनीच्या लोंबकळणाऱ्या विजेच्या वायरला लागल्याने जोरदार स्फोट झाला. या स्फोटात क्षितिज पाटील नावाचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातामुळे योगिधाम परिसरातील विजेच्या लोंबकळणाऱ्या वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून महावितरण आणि संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात असून अशा धोकादायक तारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कल्याणमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत सर्व ठिकाणी भाजपचाच विजय होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला.पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रचार सभा घेतल्या असून शेवटची सभा कल्याण–डोंबिवलीत होत आहे. सर्वत्र भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जिथे-जिथे युती झाली आहे, तिथे उमेदवारांमध्ये मोठा उत्साह असून कल्याण डोंबिवलीत २१ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे सत्ता स्थापन करण्याबाबत आमच्यात प्रचंड आत्मविश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

अदानींचं विमानतळ, भरकटलेलं राजकारण अदानींचं साम्राज्य वाढण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT