Two women arrested in Kalyan for allegedly duping a businessman of ₹35 lakh through a fake marriage promise. Saam tv
मुंबई/पुणे

लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा; दोन महिलांना अटक

Kalyan Marriage Scam Two Women Cheat Businessman 35 Lakh: कल्याणमध्ये लग्नाच्या आमिषाने दोन महिलांनी एका व्यावसायिकाची तब्बल ३५ लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे,साम टीव्ही

कल्याण: लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याची घटना अनेकदा समोर आल्या आहेत. पण आता दोन महिलांनी लग्नाचे आमिष दाखवून एका व्यवसायाची फसवणूक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून व्यावसायिकाची तब्बल ३५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील एका नामांकित दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत काम करत असल्याचे सांगत तिने व्यावसायिकाशी जवळीक वाढवली. सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून ओळख निर्माण करण्यात आली आणि त्यानंतर विश्वास संपादन करण्यात आला.

रोमा परदेशी हिने इन्शुरन्सच्या नावाखाली व्यवसायिकाकडून लाखो रुपये घेतले मात्र इन्शुरन्स पॉलिसी उघडण्यात आली नाही. काही दिवसानंतर रोमा हिने जयश्री पाटील मार्फत संबंधित व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोन्ही महिलांनी वेळोवेळी विविध कारणे सांगत संबंधित व्यावसायिकाकडून पैसे घेतले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सुमारे ३५ लाख रुपये त्यांनी या दोघींना दिले होते. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने महात्मा फुले पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.

या प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रोमा परदेशी हिला अटक केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तिची मैत्रीण जयश्री पाटील हिला कोल्हापूरमधून अटक केली असून तिला पुढील कारवाईसाठी कल्याणमध्ये आणण्यात येत आहे. तक्रारदार व्यावसायिकाने पोलिसांकडे आपले पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत फसवणूक करण्यात आली. आरोपींकडून रक्कम वसूल करून मला न्याय मिळावा,अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाच्या तपासता महात्मा फुले पोलीस करीत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

SCROLL FOR NEXT