Manasvi Choudhary
पावसाळ्यात सकाळी नाश्त्याला गरमा गरम प्यायची इच्छा होते. तुम्ही देखील चहा- कॉफीने पिऊन कंटाळात असाल तर गरमा गरम सूप प्या.
गाजर- मशरूम सूप बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी बनवू शकता.
गाजर, मशरूम, मिल्क पावडर, तूप, मीठ, काळी मिरीपावडर हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी गाजर आणि मशरूम स्वच्छ धुवून त्याचे बारीक बारीक तुकडे करा. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये गरम तूपात गाजर आणि मशरूमचे तुकडे परतून घ्या.
मिश्रण एका प्लेटमध्ये काढून आणि थंड करा. गार झाल्यावर दोन्ही मिळून मिक्सर मध्ये जाडसर पेस्ट करून घ्या.
गॅसवर कढईमध्ये पाणी आणि ही तयार पेस्ट मिक्स करून उकळून घ्या. मिश्रण उकळल्यानंतर त्यात मिल्क पावडर मिक्स करा.
त्यानंतर सूपमध्ये काळी मिरीपावडर आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. अशापद्धतीने गरमा गरम सूप तयार होईल.