Rishikesh Rafting Video: फिरायला जाताय सावधान! गाईडची मनमानी, पर्यटकाला धू धू धूतलं...; कारण काय?

या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Rishikesh Rafting Video
Rishikesh Rafting VideoSaam TV

Rishikesh Crime News: ब्रम्हपुरी येथून हाणामारीची एक मोठी घटना समोर आली आहे. येथे फिरण्यासाठी आलेले पर्यटक आणि गाईड यांच्यात राफ्टिंग करताना जोरदार हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(Latest Crime News)

व्हायरल व्हिडिओ हा ऋषिकेश येथील आहे. येथे राफ्टिंग करताना पर्यटक आणि गाईड यांच्यात वाद झाला. हा वाद पुढे इतका वाढला की, दोघांनी एकमेकांवर पॅडलने हल्ला केला. गाईडला राफ्टिंगबद्दल सर्वकाही माहिती असल्याने तो पर्यटकावर जोरात हल्ला करतो. या हल्ल्यात पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे दुसरा एक व्यक्ती आपल्या राफ्टींगमध्ये त्याला घेतो आणि त्याचे प्राण वाचवतो.

Rishikesh Rafting Video
Viral Video: दोन वृद्धांमध्ये भररस्त्यात सिनेस्टाईल स्टाईल हाणामारी; कारण वाचून पोट धरून हसाल

गो-प्रो कॅमेऱ्यावरून रंगला वाद

गो-प्रो कॅमेरा हा असा कॅमेरा आहे ज्यातून पाण्याच्या ठिकाणी आकर्षक शूट केलं जातं. यात पाण्याच्या लाटांवर सुंदर असे चित्रीकरण करता येते. मात्र पर्यटन विभागाने यावर बंदी आणली आहे. तरी देखील काही राफ्टिंग गाईड आलेल्या पर्यटकांना हा कॅमेरा बसवून शूट करण्यास सांगतात आणि जास्तीचे पैसे उकळतात. या घटनेतही असाच प्रकार घडल्याने मोठा वाद झाला आहे.

ऋषिकेश राफ्टिंगचे अनेक चाहते आहेत. अनेक व्यक्ती अशा प्रकारे राफ्टिंगसाठी लांबूनलांबून येतात. येथे येण्याआधी राफ्टिंगचे तिकीट बूक करावे लागते. हे तिकीट तुम्ही ऑनलाईन देखील बुक करू शकता.

Rishikesh Rafting Video
Pune Viral Video: भावा यासाठी वाघाचं काळीज लागतं! पुण्यातील महिलांसमोर तरुणानं केली भलतीच डेअरिंग, व्हिडीओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com