Kalyan Receptionist Assault in Clinic Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपीच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Kalyan Receptionist Assault in Clinic: कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या भावाचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. तरुणीने स्वत: कोर्टामध्ये हजर राहत माझ्या जीवाला धोका आहे त्याला जामीन देऊ नका असे सांगितले.

Priya More

Summary Points in Marathi

  • कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण प्रकरणात आरोपीच्या भावाचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

  • पीडित तरुणी कोर्टात हजर राहून प्रतिज्ञापत्र दाखल करत आरोपीच्या जामीनाला विरोध केला.

  • न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी रणजीत झा याचा जामीन नाकारला.

  • या निर्णयामुळे गोकुळ झा आणि रणजीत झा यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला.

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याणमध्ये मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या भावाचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. त्यामुळे मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ फुलेश्वर झा यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला. पीडित तरुणी स्वत: कोर्टात हजर राहिली आणि तिने आरोपीविरोधात प्रतिज्ञापत्र दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण करणारा मुख्य आरोपी गोकुळ झा याचा भाऊ आरोपी क्रमांक २ रणजीत फुलेश्वर झा याचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने आज फेटाळून लावला. ​मंगळवारी रणजीत झा याला जामीन मिळावा यासाठी कल्याण न्यायालयात आरोपी आणि फिर्यादी यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला होता. मात्र, पीडित तरुणीने आरोपीला जामीन मिळाल्यास तिच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत जामीन देऊ नये अशी मागणी केली होती.

आज, कल्याण न्यायालय मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी निलेश वासाडे साहेब (3 रे) यांच्या कोर्टाने या जामीन अर्जावर सुनावणी घेतली. सरकारी वकील ॲड. प्रकाश सपकाळे आणि पीडितेचे वकील ॲड. हरिष नायर यांनी रणजीत झा याच्या जामीन अर्जावर सक्षम आणि प्रभावीपणे युक्तिवाद करत आक्षेप नोंदवला.

विशेष म्हणजे, पीडितेने स्वतः कोर्टात हजर राहून आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पीडितेची भीती लक्षात घेऊन रणजीत झाचा जामीन अर्ज फेटाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांनी अडून धरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा

Devendra Fadnavis : पोस्टमार्टम शिवाय जनावरांची नुकसान भरपाई मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

'या' देशात घेऊ शकता कमी खर्चात शिक्षण; परदेशात शिकण्याचं स्वप्न करा पूर्ण

Navratri 2025 : गरबा खेळताना थकवा येणार नाही; फक्त 'या' ५ गोष्टी करा, एकदम फ्रेश वाटेल

पंतप्रधान मोदींचा 'तो' फोटो व्हायरल, काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, डोंबिवलीत भाजप आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT