Kalyan-Latur Highway Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan-Latur Highway: मुंबईवरून लातूरला पोहचा फक्त ५ तासांत, तयार होतोय नवा एक्स्प्रेस वे; कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार?

New Highway In Maharashtra: महाराष्ट्राला आणखी एक नवा द्रुतगती मार्ग मिळणार आहे. कल्याण ते लातूर द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते लातूर प्रवास फक्त ५ तासांचा होणार आहे.

Priya More
  • कल्याण-लातूर द्रुतगती मार्ग होतोय तयार

  • या द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते लातूर प्रवास फक्त ५ तासांचा होणार

  • कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती मार्ग ६ जिल्ह्यातून जाणार

  • माळशेज घाट परिसरात आठ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जातोय

मुंबई आणि लातूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईवरून लातूरला जाणं सोपं होणार आहे. फक्त ५ तासांत लातूरला पोहचता येणार आहे. नवा द्रुतगती मार्ग तयार होत आहे. कल्याण-लातूर नव्या द्रुतगती मार्गामुळे मराठावाडा आणि विदर्भातील अंतर लक्षणीयरित्या कमी होणार आहे. त्याचसोबत लातूर आणि मुंबईमधील अंतरही कमी होईल. आधी मुंबई ते लातूर प्रवासासाठी १० ते ११ तासांचा कालावधी लागहोता. पण हा द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी ४ ते ५ तासांसाठी कमी होणार आहे.

या द्रुतगती मार्गाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने या द्रुतगती मार्गासाठी डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) तयार केला आहे. मार्ग आणि अंतिम संरेखनाला मंजुरी देखील दिली आहे. वन विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पावर वेगाने काम सुरू केले आहे असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

हा द्रुतगती मार्ग सहा पदरी असणार आहे. प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग मुंबई आणि कल्याणसारख्या महानगरांना ग्रामीण महाराष्ट्राशी जोडणार आहे. महत्वाचे म्हणजे हा द्रुतगती मार्ग राज्यातील काही प्रमुख द्रुतगती मार्गांनाही जोडला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक कुठूनही कसाही प्रवास करू शकतील. या महामार्गामुळे लातूर, मुंबईसह इतर शहरांचे इतर राज्यांशी दळणवळण जास्त मजबूत होईल. हा द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंडळ तयार करणार आहे.

कल्याण- लातूर द्रुतगती मार्ग ६ जिल्ह्यांतून जाणार आहे. ठाणे, माळशेज घाट, पुणे, पारनेर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर असा या द्रुतगती मार्गाचा मार्ग असेल. या द्रुतगती मार्गामुळे या सर्व जिल्ह्यांचा देखील विकास होईल. सध्या, लातूरवरून मुंबईला किंवा मुंबईवरून लातूरला जाताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पण कल्याण-लातूर द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल आणि फक्त ५ तासांत लातूर पोहचणं सोपं होईल.

माळशेज घाट परिसरात या द्रुतगती मार्गाखाली ८ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे. सध्या कल्याण ते लातूर हा सर्वात लांबचा प्रवास असून यासाठी धोकादायक, वळणदार आणि अरुंद डोंगराळ रस्त्यांवरून जावे लागते. पण नव्या द्रुतगती मार्गावर एकदा हा बोगदा तयार झाल्यावर हा मार्ग सरळ होईल. सध्या कल्याणवरून लातूरला जाताना वळणाच्या आणि डोंगराळ रस्त्यावरून जाताना वाहनांचा वेग खूप कमी करावा लागतो. पण नवा द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर वाहने ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने प्रवास करू शकतील.

नवा द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर लातूर ते कल्याण, मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास देखील सोपा होईल. या महामार्गामुळे आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू येथे पोहोचणेही सोपे होईल. कल्याण-लातूर द्रुतगती मार्ग ५ महामार्गांना सोडला जाणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग, सुरत-चेन्नई आर्थिक कॉरिडॉर, विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग यांना हा द्रुतगती मार्ग जोडला जाईल.

कल्याण-लातूर द्रुतगती मार्ग या पाचही द्रुतगती मार्गांना जोडला जाणार आहे. यामुळे लातूरसारखी लहान शहरे दिल्ली, नागपूर, गोवा, सुरत आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे, कल्याण-लातूर द्रुतगती मार्गाला महाराष्ट्राचा भव्य द्रुतगती मार्ग असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र सरकार या द्रुतगती मार्गाचे काम वेगाने करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

SCROLL FOR NEXT