मुलीच्या भविष्यासाठी सरकारची भन्नाट योजना! दरमहा ₹5 हजार भरा अन् व्हा लाखपती

Government Savings Scheme: मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या व्याजदर, नियम आणि करसवलीची माहिती.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojanassj03
Published On: 

शिक्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. आपण या गोष्टीला दुर्लक्षित करू शकत नाही. पण वाढती महागाई पाहता, शिक्षणासाठी भविष्यात जास्त खर्च येऊ शकतो. त्यात मुलीच्या शिक्षणाचं आणि लग्नाचं टेन्शन असेल, तर केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) पालकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेत मुलीच्या नावावर खातं उघडून तिच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करता येते. महत्त्वाचं म्हणजे, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तिमाहीसाठी सरकारने या योजनेचा व्याजाचा दर ८.२ टक्के कायम ठेवलेला आहे.

दरमहा ५००० जमा केल्याने किती परतावा मिळेल?

समजा, तुम्ही मुलीच्या नावे दरमहा ५००० जमा केले, तर वर्षाला ६०,००० आणि १५ वर्षांत एकूण ९ लाखांची गुंतवणूक होईल. त्यानंतर पुढील सहा वर्षे पैसे जमा करण्याची गरज नाही. मात्र, खात्यातील रकमेवर व्याज मिळत राहील. व्याजदर संपूर्ण कालावधीत ८.२ टक्के कायम राहिल्यास २१ वर्षांनंतर अंदाजे २७.७३ लाख मिळू शकतात. यामध्ये सुमारे १८.७३ लाख व्याजाचा समावेश असेल.

Sukanya Samriddhi Yojana
Aadhaar Verification : ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! आधार कार्डची पडताळणी आता घरबसल्या होणार; लगेच जाणून घ्या प्रोसेस

किती गुंतवणुकीवर किती परतावा?

दरमहा १००० जमा केल्यावर अंदाजे ५.५५ लाख.

दरमहा २००० जमा केल्यावर अंदाजे ११.०९ लाख.

दरमहा ५००० जमा केल्यावर अंदाजे २७.७३ लाख.

दरमहा १०००० जमा केल्यावर अंदाजे ५५.४६ लाख.

दरमहा १२५०० जमा केल्यावर अंदाजे ६९.३३ लाख.

हे आकडे दिलेल्या व्याजदरावर आधारित अंदाज आहेत. भविष्यात व्याजदर बदलल्यास प्रत्यक्ष रक्कम बदलू शकते.

Sukanya Samriddhi Yojana
Post Office Rules 2026 : पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी नवा नियम! तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार? वाचा अपडेट्स

योजनेचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

मुलीचे वय खाते उघडताना १० वर्षांपेक्षा कमी असावे.

किमान २५० भरून खाते उघडता येते.

एका आर्थिक वर्षात किमान २५० आणि कमाल १.५० लाख जमा करता येतात.

खाते उघडल्यानंतर १५ वर्षे गुंतवणूक करता येते.

खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी खाते मॅच्युअर होते.

एका मुलीच्या नावे एकच खाते उघडता येते.

शिक्षणासाठी पैसे काढण्याची सुविधा

मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, नियमानुसार उच्च शिक्षणासाठी खात्यातील मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेल्या रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत पैसे काढता येतात. यासाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे द्यावी लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.