kalyan Farm crop damage saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणच्या शेतकऱ्यांना दिलासा, दिवाळीआधीच नुकसान भरपाई मिळणार

Kalyan Farmers : कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, दिवाळीआधीच त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तहसीलदारांनी ही माहिती दिली.

Nandkumar Joshi

  • कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी दिलासा

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

  • दिवाळीआधी नुकसान भरपाई मिळणार

  • कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांची माहिती

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही | कल्याण

संपूर्ण महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात पावसानं हाहाकार माजवला होता. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शेतकरी संकटात आहे. बळीराजा मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहायला मिळाले. नद्यांना पूर आल्याने पिकांचेच नुकसान झाले नाही, तर शेतातील मातीही खरवडून गेली आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. कल्याणमधील शेतकऱ्यांसाठी दिवाळीआधीच गोड बातमी मिळणार आहे. दिवाळीआधी त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. स्वतः तहसीलदारांनी ही माहिती दिली.

मुसळधार पावसाचा फटका कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला. अतिवृष्टीमुळं नद्यांना पूर आले होते. पिके बुडाली होती. शेती खरवडून गेली होती. काही शेतकऱ्यांच्या घरातही पाणी घुसले होते. शेतीबरोबरच घरांचेही नुकसान झाले होते. कल्याणमध्ये भाताचे पिक घेतले जाते. भातशेती करण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा सगळा खर्च पाण्यात गेला. मोठं नुकसान झालं आहे.

नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असतानाच महसूल विभाग, ग्रामपंचायत त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात ८७५ हेक्टरवरील भातपिकांचे नुकसान झाले आहे. जवळपास ३६६७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

त्या अनुषंगाने पंचनामे व याद्यांचे काम पूर्ण झाल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे. त्याचबरोबर दिवाळीआधी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाने शेतीचे झालेले नुकसान हे मोठे आहे. सरकारी अनुदान हे त्यामानाने तुटपुंजे असणार आहे. तरीही शेतकऱ्यांची विस्कटलेली घडी बसण्यासाठी थोडी का होईना मदत यामुळे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT