Marathwada Farmer: संकट काही संपेना! आधी अतिवृष्टीने झोडपलं, आता मदत मिळायला अडथळा, e-KYC मुळे ११ लाख शेतकऱ्यांची दिवाळी कडू

Marathwada Farmers News: मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाहीये. तब्बल ११ लाख शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.
Marathwada Farmer
Marathwada FarmerSaam Tv
Published On

महाराष्ट्रात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. घरात पाणी घुसलं, गोठ्यात पाणी घुसलं, शेतीचं खूप जास्त नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. दरम्यान, यासाठी आधी पाहणी केली जाणार आहे. शेतीची केवायसी केली जाणार त्यानंतरच आर्थिक मदत दिली जाणार आहे. दिवाळीपूर्वी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील, असं सांगितलं होतं. मात्र, अजूनही लाखो शेतकऱ्यांचं केवायसी बाकी आहे.

Marathwada Farmer
Marathwada : मराठवाड्यात पुन्हा हाहाकार ? आजपासून मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे मराठवाड्यातील ११ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीपूर्वी केवायसी झाले तरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी करून घ्यावे आवाहन मराठवाडा विभागीय आयुक्त प्रशासनाने केले आहे.

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम टाकण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील २० लाख ५९ हजार शेतकऱ्यांसाठी १४८९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६७३ कोटी रुपये जमा झाले आहेत. ४ लाख ११ हजार ७१६ शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेली नसल्यानं २६९ कोटी रुपये त्यांच्या खात्यावर गेलेले नाहीत.

Marathwada Farmer
Solapur-Mumbai Flight : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून सुरु होणार सोलापूर-मुंबई विमानसेवा | VIDEO

दिवाळीचा सण तोंडावर असतानाही पूर्णतः मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेली नसल्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सायंकाळी ऑनलाइन आढावा घेतला. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने १,४१८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

यातील ४७ टक्के मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आली आहे. मराठवाड्यात यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सप्टेंबर अखेरपर्यंत सुमारे ३२ लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली. याशिवाय हजारो जनावरे दगावली. शंभराहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला. हजारो मालमत्तांची पडझड झाली. सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावे जेणेकरुन त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

Marathwada Farmer
Government Scheme: शेतकर्‍यांसाठी सरकारची आणखी एक योजना; ३० हजार रुपयांची मदत देणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com