kalyan dombivli ring road Updates SAAM TV
मुंबई/पुणे

Dombivali News: कल्याण डोंबिवलीमधील वाहतूक कोंडी सुटणार; रिंग रोडचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी

Kalyan-Dombivali News: वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. केडीएमसीचा महत्वकांक्षी प्रकल्प रिंग रूटचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.

Satish Daud

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Kalyan-Dombivali News: वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. केडीएमसीचा महत्वकांक्षी प्रकल्प रिंग रूटचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. रिंग रोड प्रकल्पात आटाळी आणि वडवली येथे बाधितांच्या प्रश्नांवर आमदार भोईर यांनी शुक्रवारी आयुक्तांशी चर्चा केली. या चर्चेत अनेक सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

रिंग रूट बाधितांना ताडाच्या झाडांचा मोबदल्यापोटी प्रति झाडामागे ३० हजार रुपये देण्यात यावेत, तसेच रिंग रोड प्रकल्पात बाधित होणाऱ्याबाबत महापालिकेने एक खडकी योजना राबवून त्या ठिकाणी बाधितांना मोबदला देण्याचा कार्यक्रम राबवावा, अशी मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

या मागणीला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण टिटवाळा (Kalyan) मधील अंतर काही मिनिटांवर आणणाऱ्या रिंग रोड प्रकल्पात आटाळी आणि वडवली येथे काही शेतकऱ्यांची ताडाची झाडे तसेच जमिनी बाधित होत्या.

याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना प्रतिझाडामागे १० हजार रुपये देण्यात येणार होते. मात्र, हा मोबदला कमी असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. मोबदला वाढवून द्या, अन्यथा काम होऊ देणार नाही, अशी भूमिका देखील काही शेतकऱ्यांनी घेतली होती. आता या मागणीला महापालिका आयुक्तांकडून (KDMC) सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

तसेच रिंग रोड प्रकल्पात ८५० घरी बाधित होत आहेत, या बाधितांना टीडीआर स्वरूपात किंवा घर स्वरूपात मोबदला देण्याचा विचार आहे. त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मात्र, ही घरे ज्या जमीन मालकाच्या जागेवर बसली आहेत. त्या जमीन मालकाला नव्या पुनर्वसना धोरणानुसार टीडीआरचा मोबदला दिल्यास त्याने शंभर टक्के पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असं सांगण्यात आलं आहे.

त्याचबरोबर ज्या बाधितांना पुनर्वसनाचा मोबदला टीडीआर स्वरूपात हवा आहे. त्यांना तहसील कार्यालयाचे खेटे मारायला लागू नयेत म्हणून महापालिकेने एक खडकी योजना राबवून त्या ठिकाणी बाधितांना देण्याचा कार्यक्रम राबवावा, अशी मागणी आमदार भोईर यांनी या चर्चेदरम्यान केली आहे. या मागणीला सुद्धा आयुक्ताने होकार दर्शवला आहे. कल्याण डोंबिवलीतील खड्डे १३ सप्टेंबर पूर्वी बुजवणार, असे आश्वासन देखील महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT