Kalyan Dombivli Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli Rain: कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात

Priya More

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस (Kalyan Heavy Rainfall) पडत आहे. या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कल्याणमध्ये घरावर झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. कुठे नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण पाहणार आहोत...

डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दुपारपासून डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पाण्यामधूनच नागरिकांना जावे लागत आहे. या पावसामुळे दुकानदारांसह नागरिकांची तारांबळ उडाली. अर्ध्या तासाच्या पावसात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे.

कल्याणमध्ये देखील दुपारपासून जोरदार पाऊस पडत आहे. कल्याणमध्ये पावसामुळे चिंचेचे भले मोठे झाड उन्मळून पडले. कल्याणच्या आधारवाडी परिसरात ही घटना घडली. घराशेजारी असलेले झाड कोसळले. झाड कोसळल्यामुळे एका शेडचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी नाही. अग्निशमन विभागाकडून झाड हटवण्याचे काम सुरू आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागात देखील दुपारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरात जवळील ग्रामीण भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय त्यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. ग्रामीण भागातील शेतकरी या पावसाने सुखावले आहेत. सकाळपासून या ठिकाणी ढगांचा गडगडात आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. दुपारनंतर परिसरात जोरदार पाऊस सुरू झालाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT