BJP and Shinde Sena celebrate as multiple candidates are elected unopposed in the Kalyan-Dombivli Municipal Corporation elections. Saam Tv
मुंबई/पुणे

कल्याण डोंबिवलीत भाजपचे 14 तर शिंदेसेनेचे 6 बिनविरोध, मनसेच्या दिग्गज उमेदवाराचा अर्ज मागे, महायुतीची विजय एक्सप्रेस सुसाट

BJP Unopposed Corporators In Kalyan Dombivli: कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे 14 तर शिंदेसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एकापाठोपाठ भाजप आणि शिंदेसेनेने खाते उघडायला सुरूवात केली आहे. 30 डिसेंबर 2025 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती तर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. मात्र अर्ज भरून काही तास उलटत नाही त्याआधीच भाजपने मोठी खेळी खेळत एकेक उमेदवार गुलाल उधळताना दिसत आहे.

खरंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा कल्याण डोंबिवली हा बालेकिल्ला आहे. यामुळे रवींद्र चव्हाण यांचा विजयरथ हा सुसाट धावत आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे यांचा देखील लोकसभा मतदारसंघ असल्याने शिंदेंची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र शिंदे यांनी देखील या ठिकाणी विजयाचा शंखनाद फुंकला आहे. मतदानाआधीच भाजपचे 12 तर शिंदेसेनेचे 6 नगरसेवक निवडून आल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक

१)रेखा चौधरी

२)आसावरी नवरे

३)रंजना पेनकर

४)ज्योती पाटील

५)मंदा पाटील

६)महेश पाटील

७)मुकुंद पेंडणेकर

८)साई शेलार

९)दिपेश म्हात्रे

१०)जयेश म्हात्रे

११)हर्षदा भोईर

१२)रविना माळी

१३)सुनीता पाटील

१४)पूजा म्हात्रे

शिंदेसेनेचे निवडून आलेले बिनविरोध नगरसेवक

१)रमेश म्हात्रे

२)विश्वनाथ राणे

३)हर्षल मोरे

४)वृषाली जोशी

५)रेश्मा निचल

६)ज्योती राजन मराठे

तर डोंबिवलीमध्ये भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विशेष म्हणजे अर्ज मागे घेतल्यानंतर मनोज घरत यांनी मनसेच्या शहराध्यक्ष पदाचाही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मनोज घरत यांनी मनसेचे नेते राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीमागील कारणांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. माध्यमांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागचं कारण विचारलं असता मनोज घरत यांनी यावर बोलणं टाळलं. यावर राजू पाटील बोलतील असं सांगत त्यांनी काढता पाय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक ते मुंबई आदिवासी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचा आजचा दुसरा दिवस

Mahhi Vij: घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या 6 वर्षांच्या लेकीसाठी घेतली तब्बल 50 लाखाची कार, पाहा VIDEO

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी जोरजोरात ओरडू लागली; पहाटे दिला बाळाला जन्म, राज्यात खळबळ

Rava vs Maida: रवा म्हणजे खरंच मैद्याचाच प्रकार आहे का? जाणून घ्या सत्य

Pink Lips काळे पडले? ओठांवर लावा 'हा' घरगुती पदार्थ, ओठ होतील गुलाबाच्या पाकळीसारखी कोमल

SCROLL FOR NEXT