मोठी बातमी; एबी फॉर्म खाणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागे, कारण आलं समोर

pune political news : एबी फॉर्म खाणाऱ्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर उमेदवाराने अर्ज मागे घेतलाय.
eknath shinde news
eknath shindeSaam tv
Published On
Summary

पुण्यात मोठी राजकीय घडामोड

पक्षाकडून बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या

बंडखोर उद्धव कांबळे यांनीही घेतला अर्ज मागे

पुणे महापालिका निवडणकीच्या तोंडावर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. महापालिकेत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय पक्षातील नेते बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या करत आहेत. काही काही ठिकाणी बंडखोरी थोपवण्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांना यश मिळताना दिसत आहे. पुण्यात शिंदे गटालाही काही ठिकाणी बंडखोरी थोपवण्यास यश आल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील शिंदे गटाचे बंडखोर उद्धव कांबळे यांनीही अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्यावर एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप होता.

पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ मधील शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार उद्धव कांबळे यांनी अखेर माघार घेतली. उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे माघार घ्यावी लागल्याचे सांगण्यात आलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेने आदेश दिल्यानंतर कांबळेंनी माघार घेतली. आता या प्रभागात शिंदे गटाचे मच्छिंद्र ढवळे हे अधिकृत उमेदवार असतील. उद्धव कांबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने ढवळे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

eknath shinde news
कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधी निकाल लागला; शिंदे गटाने उधळला विजयाचा गुलाल, ३ नगरसेवक बिनविरोध

कांबळे यांनी खरंच फॉर्म खाल्ला का?

एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप झाल्यानंतर उद्धव कांबळे म्हणाले होते, 'माझी मेडिकल करा, मी कोणाचा ही फॉर्म खाल्लेला नाही. मी आमच्या शिवसेनेच्या पक्षासोबत चर्चा केली आहे. मी अधिकृत उमेदवार. मी तिथे असलेल्या प्रतिस्पर्धी मच्छिंद्र ढवळे यांना ओळखत नाही'.

eknath shinde news
6,6,6,6,6,6....दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी, VIDEO

तत्पूर्वी, उद्धव कांबळे यांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ मधून उमेदवारी अर्ज भरला होता. शिवसेना पक्षाकडून २ उमेदवारांना एकच एबी फॉर्म दिल्यामुळे कांबळे यांच्यावर त्यांच्याच प्रतिस्पर्धी मच्छिंद्र ढवळे यांचा ए बी फॉर्म खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप कांबेळांनी फेटाळला. मी फॉर्म अनवधानाने फाडला. पण मी खाल्ला नाही', असे उद्धव कांबळेंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com