6,6,6,6,6,6....दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी, VIDEO

sherfane rutherford batting : दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी खेळली. दोघांनी विरोधी संघाची दाणादाण उडवली.
sherfane rutherford batting video
sherfane rutherford batting video Saam tv
Published On
Summary

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची जबरदस्त खेळी

शेरफेन रदरफोर्डला मुंबई इंडियन्सने केलंय खरेदी

खेळाडूंकडून षटकारांचा पाऊस

आयपीएल २०२६ च्या लिलावात खरेदी केलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने जबरदस्त खेळी खेळली आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या वादळी मैदानातील प्रेक्षकही अवाक झाले. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज शेरफेन रदरफोर्डला मुंबई इंडियन्सने खरेदी केला आहे. याच मुंबई इंडियन्समध्ये सामील झालेल्या फलंदाजाने मैदानात षटकारांचा पाऊस करत कमाल केली आहे.

sherfane rutherford batting video
आयुष्य भाजपमध्ये चाललंय, ऐनवेळी पैसेवाल्यांना तिकीट; अकोल्यात निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, शहरात नेमकं काय घडलं?

दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये रदरफोर्डने प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळताना १५ चेंडूत ४७ धावांची खेळी खेळली. या डावात रदरफोर्डने ६ षटकार लगावले. ३१३ च्या स्ट्राइक रेटने खेळताना रदरफोर्डने विरोधी टीमच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुसरीकडे त्याने डेवाल्ड ब्रेविसला चांगली साथ दिली. डेवाल्डनेही १३ चेंडूत ३६ धावा कुटल्या.

sherfane rutherford batting video
मुंबईत वंचित बहुजन आघाडीला बालेकिल्ल्यात मोठा धक्का; ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने बंडखोरी उफाळली

शेरफोन रदरफोर्ड आणि डेवाल्ड ब्रेविसच्या फलंदाजीचं सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. दोन्ही फलंदाजांनी लगावलेल्या षटकारांची सर्वत्र चर्चा होत आहे. या दोघांनी षटकार लगावण्याची सुरुवात १८ व्या षटकांपासून सुरू केली. कॉर्बिन बॉशने टाकलेल्या षटकात पाचव्या आणि सहाव्या चेंडूत ब्रेविसने दोन षटकार लगावले. रदरफोर्डने त्यानंतर १९ व्या षटकातील पहिल्या ४ चेंडूत चार षटकार लगावले.

sherfane rutherford batting video
२९ महापालिकांमध्ये ३३६०६ जणांना व्हायचंय नगरसेवक; मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सर्वाधिक अर्ज, तुमच्या शहरात किती?

ब्रेविस आणि रदरफोर्डच्या जोडीने शेवटच्या तीन षटकात कमाल केली. दोघांनी प्रीटोरिया कॅपिटल्स संघासाठी चांगल्या धावा कुटल्या. कॅपिटल्सने १७ व्या षटकात ५ गडी गमावून १४८ धावा केल्या होत्या. दोघांनी १८ चेंडूत ७२ धावा कुटल्या. दोघांच्या खेळीमुळे कॅपिटल्सची धावसंख्या २० षटकात ५ गडी गमावून २२० वर पोहोचली. शेरफेनने या डावात ६ षटकार लगावले. ब्रेविसने एक चौकार आणि ४ षटकार लगावले. शेरफेनचा संघ १४.२ षटकानंतर १३५ धावांवर गारद झाली होती. त्यानंतर दोघांनी डाव सावरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com