आयुष्य भाजपमध्ये चाललंय, ऐनवेळी पैसेवाल्यांना तिकीट; अकोल्यात निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, शहरात नेमकं काय घडलं?

Akola News : अकोल्यात निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. ऐनतिकीट नाकारल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
akola politics
akola Saam tv
Published On
Summary

अकोल्यात पाहायला मिळाले राजकीय रुसवे-फुगवे

भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे कार्यकर्त्यांची नाराजी

आक्रमक कार्यकर्त्या अकोटफैल प्रभागातून होत्या इच्छुक

अक्षय गवळी, साम टीव्ही

32 वर्षापासून आम्ही पती-पत्नी पक्षात कार्यरत आहोत. अख्ख आयुष्य भाजपात चालंलंय. मात्र, पैसेवाल्यांना तिकीट मिळतंये. पण निष्ठावंतांना बाजूला ठेवल्या जातेये. बायको मरते तरं मरू दे!, घरी प्रेत घेऊन जाईल. ऐकलेत... हे वाक्य आहे, अकोल्यातील भाजप पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याचं. नेमकं काय घडलं अकोला शहरात आज, पाहूयात.

आज उमेदवारी दाखल करण्याचा सर्वात शेवटचा दिवस. मात्र हा शेवटचा दिवस गाजला तो राजकीय रुसवे-फुगवे, नाराजी आणि बंडखोरीच्या घटनांनी. अकोल्यातही आज अनेक बंडखोऱ्या रुसवे-फुगवे पाहायला मिळालेत. मात्र, मोठी चर्चा झाली ती भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी रंगलेल्या नाराजी नाट्याची.

अकोल्यातील अकोट फैल भागातून इच्छुक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्या 'शकुंतला जाधव' यांनी विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी जात मोठा गोंधळ घातला. आपल्याला उमेदवारी का मिळाली नाही? याचा जाब विचारात करत त्यांनी रडायला सुरुवात केली. यामुळे त्यांचा रक्तदाब कमी झालाय, अन त्यांना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

akola politics
Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?

काल अकोल्यात बऱ्याच घडामोडी घडल्यायेत.. ऐनवेळी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली. 80 पैकी 14 जागा राष्ट्रवादीला मिळाल्याये. एकंदरीत शकुंतला जाधव इच्छुक असलेली जागाही राष्ट्रवादीच्या वाटेवर गेलीय. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी त्या अकोटफैल प्रभागातून इच्छुक होत्या. मात्र, तिकीट न मिळाल्याने त्या नाराज झाल्या.

त्यांच्यासह समर्थकांनी भाजपचे निवडणूक प्रभारी असलेले विजय अग्रवाल यांच्या निवासस्थाकडं आपला मोर्चा वळवला. याचंवेळी तिकीट न मिळाल्याचा जाब विचारला? त्यानंतर भाजपच्या निष्ठावंतांना डावलल्या जात असल्याचा आरोप केलाय. पुढं थोड्यावेळातचं जाधव यांना अश्रू अनावर झालेये.. गोंधळ सुरू असतानाच रक्त दाब वाढला, अन जाधव यांची तब्येत बिघडली.. अस्वस्थ होऊन खाली पडल्यायेत..मात्र, या गोंधळानंतर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळालाय.

akola politics
महायुती फुटली! भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का; रामदास आठवलेंनी कुठून कोणता उमेदवार उतरवला?

जाधवांनी काय केले आरोप?

'32 वर्षापासून आम्ही पती-पत्नी पक्षात कार्यरत आहोत! अख्ख आयुष्य भाजपात चाललंय. पैसेवाल्यांना तिकीट मिळतंय.. मात्र, निष्ठावंतांना बाजूला ठेवतात. बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेत उमेदवारी देताय? बाहेरून आणि नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देता. मात्र, आमच्यासारख्या निष्ठावंतांचं तिकीट पक्ष तिकीट नाकारतो. कार्यकर्त्यांसाठी ही वाईट वेळ आली आहे, असा आरोप शकुंतला जाधव यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com