महायुती फुटली! भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का; रामदास आठवलेंनी कुठून कोणता उमेदवार उतरवला?

bmc Election Latest update : मुंबई महापालिकेत शेवटच्या क्षणी महायुती फुटल्याचं पाहायला मिळत आहे. रामदास आठवले यांच्या निर्णयाने भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
BMC Election News
BMC Election Saam tv
Published On
Summary

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतील फुटल्याचं चित्र आहे

रामदास आठवले यांच्या आरपीआयने ३९ उमेदवार जाहीर केले आहेत

जागावाटपात डावलल्याचा आरोप रामदास आठवलेंनी केला आहे

मुंबई महापालिका निवडणुकीची चुरस वाढली आहे. महायुतीचा जागावाटपचा फॉर्म्युला सोमवारी उशिरा रात्री फायनल झाला. या जागावाटपात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या रामदास आठवलेंच्या आरपीआयला देखील जागा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आठवलेंच्या पक्षाला निराशा पदरी पडली. यानंतर आज रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाने तब्बल ३९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. रामदास आठवले यांच्या भूमिकेने भाजप आणि शिंदे गटाला धक्का मानला जात आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे की, भाजपने रात्री उशिरा केवळ ७ जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु ऐनवेळी नवीन ठिकाणी उमेदवार उभे करणे अशक्य आहे. मुंबईत आमची ताकद वंचित बहुजन आघाडीपेक्षा जास्त असूनही जागावाटपात आम्हाला डावलले गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे'.

BMC Election News
ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्यांचा कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम

'आम्ही दुसऱ्या नेत्यांसारखे वारंवार शब्द फिरवणारे किंवा सोयीनुसार भूमिका बदलणारे नाहीत. मुळात पक्ष, कार्यकर्ते आणि त्यांचा स्वाभिमान विसरून तडजोड करणे आम्हाला मान्य नाही. कारण कार्यकर्त्यांची ताकद हीच पक्षाची खरी ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मान आणि पक्षाचे अस्तित्व पणाला लावून आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही. आमचा शब्द आणि आमची निष्ठा पक्की आहे, असे रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं.v

BMC Election News
Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?

'व्यापक दृष्टीने विचार केल्यास आंबेडकरी समाजाची शक्ती सत्तेत सहभागी असणे आणि त्यामाध्यमातून जनसामान्यांची कामे अविरत चालू राहणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही याचे गांभीर्य लक्षात घेऊनच महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. निवडणुकीच्या निकालानंतर पुढील अनेक निर्णय घेता येतील, पण आता हे स्पष्ट आहे की, आम्ही ३८ ते ३९ जागांवर 'मैत्रीपूर्ण लढत' लढू. आमचा महायुतीला पाठिंबा कायम असला, तरी या जागांवर आरपीआय आपली ताकद दाखवून देईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com