ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्यांचा कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम

BJP Political News : ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील बड्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम ठोकला आहे.
BJP party
BJPSaam tv
Published On
Summary

भाजपमध्ये नाराजीनाट्य

मुलुंडमध्ये भाजप नेत्यांचे राजीनामे

माजी नगरसेविकेचाही ठाकरे गटात प्रवेश

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. उमेदवारी डावलल्याने बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुलुंडमध्ये भाजप नेत्यांकडून राजीनामे दिले जात आहेत. ऐन निवडणुकीत तिकीट कापल्याने इच्छुक उमेदवारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

BJP party
मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार; ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

मुंबईतील मुलुंड भाजप अध्यक्ष मनीष तिवारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मनीष तिवारी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील भाजपचा राजीनामा दिला आहे. गेली अनेक वर्ष भाजपमध्ये काम करत असताना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे राजीनामा दिला आहे.

मुलुंडमधील भाजप महामंत्री प्रकाश मोठे यांनीही पक्षाचा राजीनामा दिलाय. प्रकाश मोठे यांच्यासहित दिनेश पाल, प्रवीण झा, महादेव गावडे, सौरभ गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

BJP party
अवघ्या ४ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीही चकाकली; सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?

माजी नगरसेविका आशावरी पाटीलही ठाकरे गटात

माजी नगरसेविका आशावरी पाटील देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. भाजपच्या माजी नगरसेविका आणि दोन टर्म निवडून आलेल्या आशावरी पाटील यांनी भाजपकडून यंदा प्रभाग क्र १३ उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. या नाराजीतून ठाकरे गटात प्रवेश करत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. या घडामोडीमुळे भाजपला स्थानिक पातळीवर मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

BJP party
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

घाटकोरमध्ये भाजपकडून कुणाला मिळाली संधी?

मुंबईतील घाटकोपर पूर्वमधून प्रभाग क्रमांक 130, 131, 132 मधील उमेदवारी जाहीर झाल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 130 - धर्मेश गिरी, प्रभाग क्रमांक 131 - राखी जाधव आणि प्रभाग क्रमांक 132 मधून श्रीमती रितू तावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com