मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार; ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

BMC Ajit Pawar Group : मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार असून ३७ उमेवदारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSaam Tv
Published On

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्ष अजित पवार गटानेही कंबर कसली आहे. मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार आहे. महापालिकेसाठी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटासोबत न जाता अजित पवार गटाने वेगळी चूल मांडली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आज रविवारी पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत ३७ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सना मलिक यांनी अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. आमदार सना मलिक यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. आमची पहिली यादी जाहीर केली आहे. आम्ही मुंबई महानगरपालिकेसाठी 37 उमेदवारांची जाहीर केली. २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना प्राधान्य दिलं आहे. आम्ही तरुणांना युवांना जास्त प्राधान्य देण्याचा यादीत प्रयत्न केला आहे. तसेच सर्व धर्म जातीचे उमेदवार आमच्या यादीत राहतील याकडे देखील लक्ष ठेवलं'.

Ajit Pawar News
डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; हिरवा पाऊस, गुलाबी रस्ते…आता चॉकलेटी धूर? व्हिडिओ व्हायरल

'महायुतीसोबत असताना आम्ही कधी विचारधारेवर तडजोड केली नाही. धनंजय पिसाळ हे राष्ट्रवादीकडे पुन्हा परत आले आहेत. जनता सर्वश्रेष्ठ आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत आहे. आमच्या विचारधारेची लोक आहेत, ते जवळ आले तर त्यांना आम्ही जोडून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत कमीत कमी 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहे'.

Ajit Pawar News
Maharashtra Politics : शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाणार नाही; बड्या नेत्याचा दावा

नवाब मलिक यांच्या नेतृत्वावर भाष्य करताना सना मलिक म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार हे पक्ष ठरवणार आहे. पक्षाने ठरवलं होतं की, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जाणार आणि त्याच पद्धतीने पक्ष काम करत आहे'.

महायुती पक्ष प्रवेशावर बोलताना म्हणाल्या, 'युतीमध्ये कोणाला संधी नाही मिळाली. तर ते आमच्याकडे संधी मागायला येतात. त्यामुळे आम्ही त्यांना संधी देतो आणि आमच्या सोबत पुढे घेऊन जातोय'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com