डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; हिरवा पाऊस, गुलाबी रस्ते…आता चॉकलेटी धूर? व्हिडिओ व्हायरल

dombivli pollution : डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीतील चॉकलेटी धूराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
dombivli pollution
KDMC Saam tv
Published On
Summary

डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

प्रदूषणाच्या मुद्द्यावरून नागरिकांचा संताप

एमआयडीसीमध्ये चेंबरमधून निघतोय चॉकलेटी रंगाचा धूर

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली MIDC परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. यावरून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी हिरवा पाऊस, तर कधी गुलाबी रंगाचे रस्ते यामुळे चर्चेत आलेल्या MIDC मध्ये आता थेट चेंबरमधून चॉकलेटी रंगाचा धूर बाहेर पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

व्हायरल व्हिडिओमध्ये MIDC परिसरातील ड्रेनेज/चेंबरमधून घनदाट, गडद रंगाचा धूर निघताना स्पष्टपणे दिसतोय. यामुळे परिसरातील हवेच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, रात्रीच्या वेळी औद्योगिक सांडपाणी आणि रासायनिक वायू सोडले जात असल्याचा संशय आहे.

dombivli pollution
मंगेश काळोखेंना भररस्त्यात संपवलं; खोपोलीतील हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

या घटनेमुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, दुर्गंधी अशा तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे नागरिक सांगतात. MIDC मध्ये नियम फक्त कागदावरच आहेत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. वारंवार तक्रारी करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.

dombivli pollution
Maharashtra Politics : खासदार असदुद्दीन ओवैसी यांना मोठा धक्का; प्रदेश कार्याध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

तत्पूर्वी, या व्हिडिओची दखल घेत तत्काळ तपासणी करून संबंधित उद्योगांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर MIDC परिसरातील प्रदूषण आरोग्यासाठी आणखी घातक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डोंबिवली MIDC मधील प्रदूषणावर प्रशासन काय भूमिका घेते आणि व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काय, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Q

डोंबिवली MIDC पुन्हा चर्चेत का आली?

A

डोंबिवलीच्या MIDC परिसरातील चेंबरमधून चॉकलेटी रंगाचा धूर निघतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे डोंबिवलीतील MIDC पुन्हा चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com