कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधी निकाल लागला; शिंदे गटाने उधळला विजयाचा गुलाल, ३ नगरसेवक बिनविरोध

kalyan Politics : कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधी निकाल लागला आहे. कल्याण-डोंबिवलीत ३ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.
Eknath shinde political news
shinde group Latest newsSaam tv
Published On
Summary

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाने उधळला विजयाचा गुलाल

शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

आणखी उमेदवार बिनविरोध येण्याचा शिंदे गटाचा दावा

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Eknath shinde political news
Maharashtra Politics : मोठी राजकीय घडामोड! राज ठाकरे अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कारण काय?

शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या तिन्ही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचे समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विजय शिवसेनेसाठी केवळ निवडणुकीतील यश नसून आगामी महापालिका राजकारणात आत्मविश्वास मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे.

Eknath shinde political news
ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आणि यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक राहणार असल्याचे हे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे द्योतक मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com