KDMC Mariyam Tower File Missing  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli : गंभीर! केडीएमसीतून आणखी एक फाईल गायब, महानगरपालिकेत नेमकं काय सुरू?

KDMC Mariyam Tower File Missing : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अभिलेखा विभागातून ‘मरीयम टॉवर’ इमारतीची महत्त्वाची फाईल गायब झाल्याचे समोर आले आहे. नगररचनाकारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • केडीएमसी अभिलेखा विभागातून ‘मरीयम टॉवर’ इमारतीची फाईल गायब झाली

  • नगररचनाकारांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद

  • बेकायदा बांधकामांच्या फाईलीच गायब होत असल्याने संशय वाढला

  • या प्रकरणामुळे महापालिकेच्या अंतर्गत कामकाज आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या अभिलेखा विभागातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. यापूर्वी यूसूफ हाईटस या बेकायदा इमारतीची फाईल गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता ‘मरीयम टॉवर’ या इमारतीची फाईलही अभिलेखा विभागातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी महापालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे येथे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संबंधित इमारतीची अधिकृत कागदपत्रे, परवानग्या व नकाशे यांचा समावेश असलेली फाईल अभिलेखा विभागातून उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. फाईल नेमकी कधी आणि कशी गायब झाली, यामागे निष्काळजीपणा की हेतुपुरस्सर कृत्य आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

दरम्यान, अलिकडच्या काळात अभिलेखा विभागातून महत्त्वाच्या फाईली गायब होण्याच्या घटनांमुळे महापालिकेच्या अंतर्गत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बेकायदा बांधकामांशी संबंधित कागदपत्रेच वारंवार गायब होत असल्याने या प्रकारामागे मोठे रॅकेट तर नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण अपघात, भरधाव ट्रकची समोरून धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू

Glass Vs Plastic Tiffin Box: टिफिनसाठी प्लास्टिकचे की काचेचे कोणते डबे वापरावे?

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT