kalyan dombivli Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : बदलापूरमधील घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका खडबडून जागी; शहरातील शाळांबाबत घेतला मोठा निर्णय

Kalyan News in Marathi: बदलापूरमधील घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका खडबडून जागी झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील शाळांबाबत घेतला मोठा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण :- बदलापूर येथील नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. या घटनेनंतर सरकारने शाळा प्रशासनांना मुलांच्या सुरक्षिततेबाबत सूचना करण्यात आल्यात. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार असल्याची माहिती इंदू रानी जाखड यांनी दिली. तसेच ज्या खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही नसतील, त्यांना सीसीटीव्ही बसवावेत, अशा सूचना करण्यात आल्याचे सांगितले. तसेच मुलींच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजनांसाठी महापालिकेच्या शाळांसह सर्व खासगी शाळांमध्ये कार्यशाळा घेणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आणि तामिळ माध्यमाच्या एकूण 61 शाळा आहेत. या शाळांमधून जवळपास 8 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी किती खर्च येणार, किती सीसीटीव्ही लागणार याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

महापालिका हद्दीतील सर्व खासगी शाळांनीही सरकारच्या आदेशाप्रमाणे सीसीटीव्ही लावण्याची कारवाई करावी. ज्या शाळांनी सीसीटीव्ही लावले नसतील त्यानी ते लावावे. तसेच ज्या शाळेत सीसीटीव्ही आहेत. मात्र ते नादुरुस्त असल्यास त्याची देखभाल दुरुस्ती तातडीने करावी, अशा सूचनाही तातडीने सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनास दिल्या आहेत. यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे कार्यशाळा महापालिका शाळांमध्ये तसेच खाजगी शाळांमध्ये देखील घेण्यात येणारच त्याचे माहिती यावेळी पालिका आयुक्तांना दिली. महापालिका आयुक्त जाखड यांनी गणेशोत्सवापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे डागडूजी करण्यात येईल, असे सांगितले. तसेच एमएमआरडीए, एमएसआरटीसी, पी डब्ल्यूडी विभागाला देखील त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सूचना केल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांना प्रत्येक प्रभागात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच कमानी लावताना वाहतूक विभागाचे परवानगी घेऊन लावाव्यात. कमानी उभारताना रस्त्यावर खड्डे खोदले तर संबंधिताकडून खड्डे भरण्याचे शुल्क आकारण्यात येईल, असे देखील पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT