Bharat Bandh : जाळपोळ, रेल्वे आणि रास्ता रोको, शाळा बंद; महाराष्ट्र ते बिहारपर्यंत 'भारत बंद'चा परिणाम, ठिकठिकाणी परिस्थिती काय?

Bharat Bandh update : महाराष्ट्र ते बिहारपर्यंत 'भारत बंद'चा परिणाम परिणाम पाहायला मिळत आहे. या भारत बंदचा परिणाम ठिकठिकाणी पाहायला मिळाला. जाळपोळ, रेल्वे आणि रास्ता रोको सारख्या घटना देशभरातील विविध भागात घडल्या.
जाळपोळ, रेल्वे आणि रास्ता रोको, शाळा बंद; महाराष्ट्र ते बिहारपर्यंत 'भारत बंद'चा परिणाम, नेमकी परिस्थिती काय?
Bharat Bandh :ANI
Published On

पटना : आरक्षण बचाव संघर्ष समिती, दलित आणि आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम महाराष्ट्र ते बिहारपर्यंत पाहायला मिळत आहे. एससी-एसटी आरक्षणात सब कॅटेगिरी ठेवून क्रिमिलियरची अट घातल्याच्या विरोधात विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील अनेक ठिकणी रस्त्यांवर टायर जाळपोळ, रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळत आहे.

देशभरात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी आंदोलक तरुणांनी शहरभर दुचाकी रॅली काढूनही बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवलेली पाहायला मिळाली. तसेच आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

एससी एसटी प्रवर्गाला क्रिमिलियरच्या घातलेल्या अटीच्या निर्णयाच्या विरोधात देशभरात पडसाद उमटत आहेत. देशभरातील काही भागात आंदोलकांनी रेल्वे आणि रास्ता रोको देखील केला आहे. या भारत बंदचा परिणाम हा ट्रेन आणि बस सेवेवर देखील झाला आहे. बिहार, झारखंड, राजस्थान सारख्या शहरातही जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात पुकारलेल्या भारतचा बंदचा परिणाम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही दिसून आला.

जाळपोळ, रेल्वे आणि रास्ता रोको, शाळा बंद; महाराष्ट्र ते बिहारपर्यंत 'भारत बंद'चा परिणाम, नेमकी परिस्थिती काय?
Bharat Bandh: उद्या भारत बंद; कोणत्या सेवांवर होणार परिणाम,कोणते क्षेत्र आहेत संवेदनशील? जाणून घ्या

गुजरातमध्ये आंदोलकांनी मालगाडी थांबवली

गुजरातच्या सुरेंद्र नगर जिल्ह्यात मालगाडी थांबवली. बडसर फाटकाजवळ आंदोलकांनी मालगाडी रोखली. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच घटनास्थळी धाव घेतली. बिहारमध्येही अनेक ठिकाणी भीम आर्मीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनकर्त्यांकडून महामार्ग देखील अडवण्यात आले आहेत. तर राजस्थानमध्ये काही शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.

जाळपोळ, रेल्वे आणि रास्ता रोको, शाळा बंद; महाराष्ट्र ते बिहारपर्यंत 'भारत बंद'चा परिणाम, नेमकी परिस्थिती काय?
Kolhapur News : रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने संपवलं जीवन; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

एससी-एसटी आरक्षणात सब कॅटेगिरी ठेवल्याच्या निर्णयाचे पडसाद राज्यातही उमटले आहेत. आंदोलकांनी धाराशिवात शहरभर दुचाकी रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. या बंदला धाराशिवमध्ये मात्र संमिश्र प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. तर काही भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवलेली दिसून आली. या भारत बंदचा परिणाम धुळे जिल्ह्यातही दिसून आला. धुळे शहरातील शिवतीर्थ चौकातून आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

बीड, माजलगावमधील बाजारपेठ बंद

भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या बाजारपेठेतून दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून बीड शहरातील बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माजलगाव येथे देखील रॅली काढत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले असून आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

भारत बंदचे नांदेड जिल्ह्यात पडसाद,नांदेडमध्ये बसवर दगडफेक

भारत बंदचे नांदेडमध्ये पडसाद उमटले आहेत. उमरखेड आगाराच्या बसवर दगडफेक झाली आहे. नांदेड ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव महादेव फाट्यावर घटना घडली.एसटी बसच्या समोरील काचा अज्ञातांनी फोडल्या. बस वाहकाकडून अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

25 ते 30 लोकांनी बसवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात आठ जणांची ओळख पटल्याची माहिती हाती आली आहे. भारत बंदला बारामतीमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बारामती शहरातून आज भव्य असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com