KDMC Muncipal Election 2025 - 26 Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! शिवसेना-मनसे केडीएमसीत किती लढणार? अधिकृत आकडा समोर

KDMC Muncipal Election 2025 - 26 : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि उबाठा गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून 122 जागांपैकी 54 जागांवर मनसे, तर 68 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार आहे.

Alisha Khedekar

  • मनसे आणि उबाठा गटाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

  • 122 जागांचा 54, 68 फॉर्म्युला निश्चित

  • सक्षम उमेदवारांना संधी

  • कल्याण पश्चिमेत 12–13 मनसे उमेदवार संभाव्य

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. कुठे युती होत आहे, तर कुठे सामंजस्याने जागेच्या वाटाघाटी होत आहेत. २० वर्ष एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधू २४ डिसेंबर रोजी एकत्र आले. दोघांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी युती झाली. या घोषणेने मनसे आणि उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला. अशातच आता केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेचा फॉर्म्युला समोर आला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून 122 जागांपैकी 54 जागांवर मनसे तर 68 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार आहे.

या संदर्भात बोलताना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितले की, कल्याणमधील राजकीय परिस्थिती लक्षात घेता मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून वाटाघाटी अत्यंत सकारात्मक पद्धतीने पूर्ण झाल्या आहेत.दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही मनोमिलन झाले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली होती.

मनसेकडून ज्या जागांची मागणी करण्यात आली होती, त्या जागा शिवसेनेच्या वतीने सोडण्यात आल्या असून काही जागांबाबत ठाकरे गटानेही आग्रह धरला, त्या जागा मनसेने सोडल्याचे सांगण्यात आले.मनसे नेते राजू पाटील यांनी 122 पैकी 54 जागांची मागणी केली होती. त्यामध्ये कल्याण पश्चिमेतील 12 ते 13 जागांवर मनसे उमेदवार रिंगणात असतील, तर उर्वरित जागांवर ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर कोणताही पक्ष चर्चेसाठी पुढे आला तर त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. मात्र सध्या कोणत्याही पक्षासोबत अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.महानगरपालिकेत जास्तीत जास्त जागा मिळवणे हे उद्दिष्ट असून, युतीच्या पॅनेलमध्ये सक्षम उमेदवार मिळाल्यास त्यांना संधी देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.शंभर टक्के जागावाटप पूर्ण झाले असून दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे नेत्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: मौत दिखे तो सलाम…; सलमान खान पुन्हा सैनिकाच्या भूमिकेत, 'बॅटल ऑफ गलवान'चा दमदार टिझर प्रदर्शित

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाले, एकाचा मृत्यू

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Glass Bangles: काचेच्या बांगड्या खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

BMC Election : मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती का रखडली? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT