Pune : शिक्षिकेला 'I Love You' चा मेसेज पाठवला, ब्लेडने हातावर नाव कोरलं, पुण्यातील विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

Pune School Girl News : पुण्यातील एका शाळेत गुरु-शिष्य नात्याला धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने शिक्षिकेला प्रेम आणि अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत, नकारानंतर आत्महत्येची धमकी दिली.
Pune : शिक्षिकेला 'I Love You' चा मेसेज पाठवला, ब्लेडने हातावर नाव कोरलं,  पुण्यातील विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार
Pune School Girl Saam Tv
Published On
Summary
  • पुण्यात शाळेत विद्यार्थी-शिक्षिका नात्यातील संवेदनशील प्रकरण उघड

  • विद्यार्थिनीने शिक्षिकेला आय लव्ह यु चा मेसेज पाठवला

  • शाळा प्रशासनाने पालकांना माहिती दिली

  • किशोरवयातील भावनिक-हार्मोनल बदलांचा संभाव्य परिणाम

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुरु–शिष्यच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीने आपल्याच शिक्षिकेला वारंवार अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत, प्रेम व्यक्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, प्रेम स्वीकारले नाही तर आत्महत्येची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी ही शिक्षिकेला मोबाईलवर सातत्याने हार्ट इमोजी, ‘आय लव्ह यू’सारखे संदेश पाठवत होती. “तुम्ही मला खूप आवडता, तुम्ही दुसऱ्यांशी बोललेले मला चालत नाही, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही,” असे मेसेज तीने शिक्षिकेला पाठवल्याचे वृत्त आहे.

Pune : शिक्षिकेला 'I Love You' चा मेसेज पाठवला, ब्लेडने हातावर नाव कोरलं,  पुण्यातील विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार
Thane : ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत विकत होते, पोलिसांनी फिल्डिंग लावून उधळला डाव; बदलापुरातील धक्कादायक घटना

घडलेल्या घटनेनंतर शिक्षिकेने विद्यार्थिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनी समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून आले. तिने ब्लेडने स्वतःच्या हातावर शिक्षिकेचे नाव कोरले आणि त्याचे फोटो शिक्षिकेला पाठवले. तसेच, प्रेम स्वीकारले नाही तर शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेल, अशी धमकीही दिली. या गंभीर प्रकारामुळे शिक्षिकेने तत्काळ शाळा प्रशासनाला माहिती दिली.

Pune : शिक्षिकेला 'I Love You' चा मेसेज पाठवला, ब्लेडने हातावर नाव कोरलं,  पुण्यातील विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार
Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत महायुतीचा तिढा सुटणार का? शिवसेना-भाजपनं १३ नेत्यांना दिली मोठी जबाबदारी

शाळा प्रशासनाने याबाबत चौकशी केली असता धक्कादायक बाबी उघड झाल्या. या विद्यार्थिनीने यापूर्वी इतरही विद्यार्थिनींना ‘आय लव्ह यू’ या आशयाचे संदेश पाठवले होते. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीला वॉशरूममध्ये अडवून, “तू खूप सुंदर दिसतेस, तुला बॉयफ्रेंड आहे का?” असे विचारल्याची माहितीही पुढे आली.

Pune : शिक्षिकेला 'I Love You' चा मेसेज पाठवला, ब्लेडने हातावर नाव कोरलं,  पुण्यातील विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार
Today Winter Temprature : राज्यभरात तापमानाचा पारा घसरला, पण नव्या वर्षाची सुरूवात कडाक्याची थंडीने होणार, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शाळा व्यवस्थापनाने तातडीने आणि अत्यंत संयमाने पावले उचलली. यानंतर विद्यार्थिनीच्या पालकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थिनीचे काउंसिलिंग करण्यात आले. दरम्यान तारुण्यात येताना होणारे भावनिक आकर्षण, हार्मोनल बदल यामुळे असे प्रकार संबंधित तरुणीकडून होत असतील असा अंदाज समुपदेशकांनी वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com