Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

Pune Muncipal Corporation 2025 -26 Election News : महापालिका निवडणूक २०२५–२६ पूर्वी शिंदे शिवसेनेने स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. मात्र पुण्यात भाजपकडून १५ जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याने महायुतीत तणाव वाढला आहे. शिवसेनेला किमान २१ जागा हव्या असून १६५ जागांची यादी पुन्हा मागवण्यात आली आहे.
Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं
Pune Muncipal Corporation 2025 -26 Election NewsSaam Tv
Published On
Summary
  • शिंदे शिवसेनेने २०२५–२६ महापालिका निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर

  • पुण्यात भाजप–शिवसेना जागावाटपावरून महायुतीत तणाव

  • शिवसेनेने पुण्यातील सर्व १६५ जागांची यादी पुन्हा मागविली

  • जागावाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालणार असल्याची चर्चा

सागर आव्हाड, पुणे

आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेने आपली निवडणूक रणनिती अधिक मजबूत करत पक्षाच्या ‘स्टार प्रचारकां’ची अधिकृत यादी जाहीर केली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीत राज्य व केंद्रातील मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते, युवासेना व विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांचा समावेश असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद, अनुभव आणि नेतृत्वाचा प्रभाव याचे प्रतिबिंब या निवडीतून स्पष्टपणे दिसून येते. ‘स्टार प्रचारक’ यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादाजी भुसे, संजय राठोड, भरत गोगावले यांच्यासह अनेक ज्येष्ठ व युवा नेत्यांचा समावेश आहे तसेच महिला नेत्या, अल्पसंख्याक विभाग, युवासेना आणि आध्यात्मिक सेनेचे प्रतिनिधी यांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं
Pune : पुण्यातील नामांकित कॉलेज बाहेर रॅगिंग, विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; थरारक VIDEO समोर

शिवसेना ही केवळ निवडणूक लढवणारा पक्ष नसून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारी, विकासाभिमुख आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची वाहक शक्ती आहे, हा संदेश या प्रचारक यादीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी जनतेसमोर जाणार असल्याचे या घोषणेतून स्पष्ट होते. या ‘स्टार प्रचारकां’च्या माध्यमातून शिवसेनेची विकासाची भूमिका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारची कामगिरी आणि जनतेशी असलेली थेट नाळ प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं
Kolhapur : पाठलाग केला, प्रवाशांना चाकूचा धाक; कोल्हापूर-मुंबई खासगी बस हायजॅक, सोनं-चांदीसह १.२२ कोटींचा मुद्देमाल लुटला!

एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून पुण्यात शिवसेनेला सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचं म्हटलं जात आहे. ज्या जागा शिवसेनेला नको त्याच जागा शिवसेनेला भाजप देत असल्यामुळे महायुतीत नाराजी पाहायला मिळते आहे. पुणे भाजप निवडणूक प्रमुख गणेश बिडकर मुंबईला रवाना झाले असून शिवसेनेने सर्व १६५ जागांची यादी पुन्हा मागविली आहे. भाजपकडून १५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र शिवसेनेला किमान २१ जागा हव्या आहेत.

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं
Today Winter Temprature : राज्यात थंडीचा पारा घसरला! कमाल तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

पुण्यात भाजपकडून शिवसेनेला अपमानास्पद वागणूक

एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून पुण्यात शिवसेनेला सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचं म्हटलं जात आहे. ज्या जागा शिवसेनेला नको त्याच जागा शिवसेनेला भाजप देत असल्यामुळे महायुतीत नाराजी पाहायला मिळते आहे. पुणे भाजप निवडणूक प्रमुख गणेश बिडकर मुंबईला रवाना झाले असून शिवसेनेने सर्व १६५ जागांची यादी पुन्हा मागविली आहे. भाजपकडून १५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र शिवसेनेला किमान २१ जागा हव्या आहेत. हव्या असलेल्या जागा मिळत नसल्याने आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जागा वाटपावर जातीने लक्ष घालणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com